आता 13 हजारांच्या आत मिळेल Redmi चा 5G Phone; Redmi 11 Prime 5G च्या किंमतीत 1000 रुपयांची कपात

Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं आपल्या भारतीय चाहत्यांना न्यू इयरची भेट देत ब्रँडच्या हिट स्मार्टफोन रेडमी 11 प्राइम 5जीच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हा मोबाइल फोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच झाला होता ज्याची आरंभिक किंमत 13,999 रुपये होती. परंतु आता 1,000 रुपयांच्या प्राइस कटनंतर हा स्वस्त 5जी फोन 12,999 मध्ये खरेदी करता येईल. Redmi 11 Prime 5G price आणि Specifications ची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi 11 Prime 5G price in India

रेडमी 11 प्राइम 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेला फोनचा बेस व्हेरिएंट 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला होता तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोठ्या व्हेरिएंटनं 15,999 रुपयांमध्ये मार्केटमध्ये एंट्री केली होती. आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर फोनच्या 4GB RAM व्हेरिएंटची प्राइस 12,999 रुपये आणि 6GB RAM व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये झाली आहे. हे देखील वाचा: 50 वर्षांनंतर होणार पुनरागमन; इलेक्ट्रिक अवतारात येत आहे लोकप्रिय Kinetic Luna

Redmi 11 Prime 5G Specifications

  • 6.58″ FHD+ Display
  • 6GB RAM + 128GB ROM
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Camera
  • 18W 5,000mAh Battery

रेडमी 11 प्राइम 5जी स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे आणि 20.7:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

रेडमी 11 प्राइम 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय POCO C50; पुढील आठवड्यात होणार भारतात लाँच

फोटोग्राफीसाठी रेडमी 11 प्राइम 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी रेडमी 11 प्राइम 5जी मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या या स्मार्टफोनसह 22.5वॉट चार्जर देखील बॉक्समध्ये देत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here