50 वर्षांनंतर होऊ शकतं पुनरागमन; इलेक्ट्रिक अवतारात येऊ शकते लोकप्रिय Kinetic Luna

50 वर्षांपूर्वी भारतीय दुचाकी वाहन बाजारात लोकप्रिय झालेली moped Kinetic Luna पुन्हा एकदा बाजारात येण्यासाठी तयार आहे, परंतु यावेळी ही स्कूटर इलेक्ट्रिक अवतारात सादर केली जाऊ शकते. कायनेटिक लूनाची निर्मिती करणारी कंपनी म्हणजे कायनेटिक इंजीनियरिंग लिमिटेड (केईएल) नं घोषणा केली आहे की कंपनीनं कायनेटिक लूना इलेक्ट्रिकच्या चेसिस आणि अन्य असेंबलीचं प्रोडक्शन आधीच सुरु केलं आहे. कंपनीनुसार हा झिरो-एमिशन व्हेईकल लवकरच लाँच केलं जाईल. तसेच, सर्व नवीन कायनेटिक लूना कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पावर सॉल्यूशंसच्या माध्यमातून विकल्या जातील. अशी माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे.

दर महिन्याला 5,000 यूनिटची विक्री

यावेळी Kinetic Luna मध्ये एक ऑल-इलेक्ट्रिक पावरट्रेन दिला जाईल, अशी चर्चा आहे. तसेच कंपनीनं असा दावा केला आहे की प्रॉडक्शन लाइनमध्ये सुरुवातीला दर महिन्याला 5,000 यूनिट्सची निर्मिती क्षमता असेल. तसेच या इलेक्ट्रिक मोपेडची निर्मिती महाराष्ट्रातील अहमदनगरमधील एका प्रॉडक्शन लाइनमध्ये केली जाईल. हे देखील वाचा: Realme 10 इंडिया लाँच कंफर्म! अत्यंत कमी किंमतीत मिळणार 8GB रॅम

केईएलनं आपल्या रेग्युलेटर फाईलिंगमध्ये म्हटलं आहे की भारतात इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटची मागणी वाढत आहे आणि वजन वाहणाऱ्या प्राधान्य देत ई-लूना सादर केली जाईल. जी सर्व सेगमेंटच्या गरजा पूर्ण करेल. लाँच झाल्यावर, ई-लूना तळागाळाच्या बाजारांमध्ये कम्यूटर सेगमेंट आणि लोड कॅरियर कॅटेगरीला एक ऑल-इलेक्ट्रिक लास्ट-माइल मोबिलिटी म्हणून लक्ष करेल.

Kinetic E Luna लाँच डेट

ई-लुना कधी लाँच होईल, हे मात्र कंपनीनं अद्याप सांगितलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2023 ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी इलेक्ट्रिक लुनाचे मॉडेल्स जगासमोर ठेऊ शकते. तेव्हा या मोपेडच्या रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, फीचर्स आणि किंमतीची अधिकृत माहिती कायनेटिक ग्रुपकडून मिळू शकते.

रोज विकले जात होते 2000 पेक्षा जास्त यूनिट्स

सुमारे 50 वर्षांपूर्वी म्हणजे साल 1972 मध्ये Kinetic Luna पहिल्यांदा भारतीय बाजारात सादर करण्यात आली होती. लूना लाँच झाल्यानंतर काही दिवसांत इतकी लोकप्रिय झाली होती की रोज 2,000 पेक्षा जास्त यूनिट विकले जात होते. विशेष म्हणजे भारतीय बाजारात जेव्हा ही मोपेड सादर करण्यात आली होती तेव्हा अ‍ॅडवरटाइजमेंटसाठी कंपनीनं “चल मेरी लूना” ही एक जिंगल वापरली होती जी खूपच प्रसिद्ध होती. हे देखील वाचा: सुंदर सेल्फी काढणारा फोन स्वस्तात! 32 MP फ्रंट कॅमेरा असलेला Oppo F21s Pro वर जबरदस्त सूट

कायनेटिक ग्रुपनं 1972 मध्ये लॉन्च पेट्रोल इंजिन असलेली लुना सादर केली होती. जी अल्पावधीतच भारतातील सर्वाधिक मागणी असलेली दुचाकी बनली. पण 2000 मध्ये 28 वर्षांनंतर कंपनीने कायनेटिक लुनाची निर्मिती बंद केली होती. त्यावेळी कंपनीने या मोपेडमध्ये 50 सीसीचे इंजिन दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here