Honda ची नवीन Activa स्कूटर लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

Highlights

  • Honda 23 जानेवारीला आपली नवीन स्कूटर सादर करेल.
  • रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅक्टिव्हा 7जी इलेक्ट्रिक हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येईल.
  • कंपनीनं डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी H-Smart ट्रेडमार्क अप्लाय केला होता.

भारतात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर Honda Activa आता इलेक्ट्रिक अवतारात (Honda Activa 7G Launch) लाँचसाठी तयार आहे. होंडानं 23 जानेवारीला लाँच होणाऱ्या नवीन प्रोडक्टचं मीडिया इनवाइट पाठवण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅक्टिव्हा 7जी स्कूटर असेल जी इलेक्ट्रिक हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. परंतु कंपनीनं अभी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Honda Electric Scooter

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) नं सोशल मीडियावर शेयर केलं आहे, ज्यामुळे हिंट मिळाली आहे की कंपनी स्कूटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी देऊ शकते जी AI चा भाग असेल. नवीन टीझरवरून असे संकेत मिळतात की कंपनी नवीन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. ही नेमकी कोणती टेक्नॉलॉजी असेल हे 23 जानेवारीलाच समजेल. हे देखील वाचा: एकच नंबर! Airtel युजर्सना मिळतोय मोफत 2GB डेटा; 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर भन्नाट ऑफर

विशेष म्हणजे होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) नं गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी H-Smart ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनीची आगामी स्कूटर हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. कंपनी नवीन अ‍ॅक्टिव्हासाठी हा ट्रेडमार्क वापरू शकते असं दिसतंय.

हायब्रीड टेक्नॉलॉजी मायलेज वाढवून उत्पादकता वाढवण्यासाठी आणि धावण्याचा खर्च कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात येऊ शकते. यात एक बॅटरी मिळेल जी रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजीद्वारे रिचार्ज केली जाऊ शकते. होंडानं अद्याप हायब्रीड टेक्नॉलॉजीबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही. परंतु हायब्रीड टेक्नॉलॉजीमुळे कंपनीनं 10-15 किमीची इलेक्ट्रिक राईड ऑफर केली तर कंपनी नक्कीच स्पर्धेच्या पुढे राहू शकते.

हायब्रीड टेक्नॉलॉजीसह आल्यामुळे होंडा अ‍ॅक्टिव्हाची किंमत थोडी वाढू शकते. होंडा भारतीय बाजारात पूर्णपणे ईव्ही पोर्टफोलियो सादर करण्यापूर्वी आपल्या दुचाकीच्या ताफ्यात हायब्रीड टेक्नॉलॉजी जोडण्यासाठी उत्साहित आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच आली Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची किंमत; पाहा आहे का तुमच्या बजेटमध्ये?

OLA आणि Bajaj ला मिळणार आव्हान

होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिककडून भारतीय ईव्ही स्कूटर बाजरातील अन्य इलेक्ट्रिक स्कूटरना आव्हान मिळणे स्वाभाविक आहे. होंडाला ओला एस 1, बजाज चेतक आणि हीरो इलेक्ट्रिक एनवायएक्स एचएक्स सारख्या इलेक्ट्रिक व्हेईकलना मागे टाकावे लागेल. छोटे ब्रँड्स आणि स्टार्टअप देखील या शर्यतीत असल्यामुळे होंडाचा मार्ग थोडा कठीण वाटत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here