आयफोनच्या तोडीची OPPO Reno 10 सीरिज येणार बाजारात; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

reno 9 pro
Highlights

  • OPPO Reno 10 सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच होणार.
  • Reno 10 Pro+ 5G मध्ये पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • Reno 10 5G मध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल.

OPPO नं अलीकडेच आपली Reno 9 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. परंतु ही सीरिज भारतीय बाजारात येणार नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्याऐवजी कंपनीनं थेट Reno 10 सीरिज भारतात सादर करेल. ओप्पो रेनो 10 सीरिज सर्वप्रथम चीनी बाजारात येईल, त्यांनतर भारतासह जगभरात लाँच केली जाईल. यात Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ 5G अशा तीन प्रीमियम स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो.

हे डिवाइस 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान सादर केले जातील. परंतु ओप्पोनं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तत्पूर्वी एका नव्या रिपोर्टमधून आगामी ओप्पो रेनो 10 सीरिजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ही महत्वाची माहिती दिली आहे तसेच त्याने Reno 10 आणि Reno 10 Pro+ 5G च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. चला पाहूया… हे देखील वाचा: 2500 रुपयांमध्ये बुक करा दणकट ई बाईक; Aarya Commander मध्ये 125 किलोमीटरची रेंज

Reno 9

OPPO Reno 10 सीरिजचे लीक स्पेसिफिकेशन

सीरिजमधील वॅनिला Reno 10 स्मार्टफोन भारतातील Reno 8 5G ची जागा घेईल. ज्यात 6.7-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचे रिजोल्यूशन फुलएचडी+ असेल. आगामी ओप्पो फोनमध्ये एक 2X पोर्ट्रेट लेन्स देण्यात येईल तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा असेल. फोनमध्ये अलीकडेच भारतात आलेल्या Reno 8T 5G प्रमाणे कर्व डिस्प्ले असेल की नाही ते पाहावं लागेल.

टिपस्टरनं रेनो 10 प्रो प्लस 5जी च्या स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती दिली आहे. त्यानुसार या फोनमध्ये 1.5के डिस्प्ले दिला जाईल, जो 1220 x 2712 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. फोनमध्ये 50MP Sony IMX890 मेन कॅमेरा सेन्सर म्हणून मिळेल. या डिवाइसमध्ये एक पेरिस्कोप लेन्स देखील मिळेल जी या सेगमेंटमध्ये दुर्मिळ आहे. Reno 10 Pro+ 5G मध्ये 4,600mAh ची ड्युअल सेल बॅटरी दिला जाईल. ओप्पोचा सध्याचा ट्रेंड पाहता या फोनमध्ये 80W किंवा 100W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन; तारीख ठरली

डिजिटल चॅट स्टेशननं याआधी रेनॉ 10 प्रो प्लस 5जी चे डिजाइन रेंडर देखील लीक केले होते. ज्यातून नवीन कॅमेरा मॉड्यूल दिसला होता. या फोनमध्ये पिल शेप कॅमेरा मॉड्यूल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह दिला जाईल. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. तर फ्रंटला मध्यभागी एक पंच होल कटआऊट असलेला डिस्प्ले मिळेल. लवकरच या सीरिजच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळू शकते, त्यामुळे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here