512जीबी मेमरी आणि 12.9-इंचाच्या डिस्प्ले सह न्यू ऍप्पल आईपॅड प्रो लॉन्च

गेल्या महिन्यात ऍप्पल ने आईफोन लॉन्च केला होता. तर काल कंपनी ने न्यू यॉर्क मध्ये आयोजित एका कॉन्फ्रेंस मधून न्यू आईपॅड प्रो आणि ऍप्पल मॅक मिनी सीरीजचे डिवाइस सादर केले आहेत. लॉन्च सोबतच कंपनी ने स्पष्ट केले कि लवकरच हे डिवाइस भारतात पण उपलब्ध होतील. आईपॅड सोबत कंपनी ने आपली सेकेंड जेनरेशन पेंसिल पण सादर केली आहे. खाली आम्ही या डिवाइसची सविस्तर माहिती दिली आहे.

ऍप्पल चा न्यू आईपॅड प्रो 11-इंच आणि 12.9-इंचाच्या दोन स्क्रीन साइज मध्ये उपलब्ध आहे. कंपनी ने हे लिक्विड रेटीना डिस्प्ले सह सादर केले आहेत. तसेच खास बाब अशी कि नवीन आईपॅड प्रो कंपनी ने फेस आईडी इंटीग्रेशन सह सादर केला आहे जे आधी फक्त ऍप्पल आईफोन मध्ये उपलब्ध होते. तसेच न्यू आईपॅड प्रो मध्ये ट्रूटोन ​एंटी रिफ्लेक्टिव कोटिंगचा वापर करण्यात आला आहे जो​फक्त चांगले रंग दाखवत नाही तर स्क्रॅचेस पासून पण वाचवतो. तसेच यात हाय प्रोमोशन टेक्नॉलॉजी पण आहे जी 120 हट्र्ज रिफ्रेश रेट सह स्मूथ वीडियो एक्सपीरियंस देऊ शकते. कंपनी चे म्हणणे आहे कि याचे कापरे आधीपेक्षा जास्त राउंड झाले आहेत जे अजून चांगला अनुभव देतील.

न्यू आईपॅड प्रो कंपनी ने ए12एक्स बाइयोकॉन चिपसेट वर सादर केला आहे जो खूप पावरफुल आहे. आईफोन 10एस मध्ये पण हाच चिपसेट आहे. यात आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि हा टॅबलेट फोटो एडिटिंग आणि 3डी मॉडेल बनवू शकतो. तसेच याचा एआर एक्पीरियंस पण बेस्ट आहे. कंपनी ने माहिती दिली आहे कि जुन्या मॉडेल पेक्षा नवीन आईपॅड 35 टक्के जास्त फास्ट आहे आणि 10 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

ऍप्पल चा हा डिवाइस आईओएस 12 आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यात स्मार्ट कीबोर्ड फोलियो, एनिमोजी आणि मीमोजी सारखे अनेक फीचर्स मिळतील. यात ऍप्पल पेंसिल सपोर्ट आहे जी नोट घेण्यास किंवा मॉडेल बनवण्यास उपयोगी पडेल. तसेच आईफोन प्रमाणे यात टॅप टू वेक आणि स्वाइपिंग टू गो होम सारखे आॅप्शन मिळतील. यात एक्सेस कंट्रोल सेंटर आणि मल्टीटास्किंगचा पण आॅप्शन आहे.

फोटोग्राफी व वीडियो कॉन्फ्रेंसिंग साठी या डिवाइस मध्ये 12-मेगापिक्सलचा रियर आणि 7-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऍप्पल ने यावेळी लाइटनिंग चार्जरचा वापर न करता यूएसबी टाइप-सी दिला आहे. यात यूसबी 3.1 सपोर्ट आहे जो फास्ट चार्जिंग सोबतच डेटा ट्रांसफर पण करू शकतो.

न्यू ऍप्पल आईपॅड प्रो सिल्वर आणि स्पेस ग्रे मॉडल मध्ये उपलब्ध आहे. तसेच हा 64जीबी, 256जीबी आणि 512जीबी मेमरी मध्ये मिळेल. सोबतच हा सेल्यूलर आणि वाईफाई मॉडेल मध्ये येतो. सेल्यूलर मॉडल मध्ये तुम्ही 4जी एलटीई सिमचा वापर करू शकाल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here