चार रियर कॅमेरा आणि कोणत्याही बटण विना येईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 10

सॅमसंग यावर्षीच्या शेवटपर्यंत गॅलेक्सी नोट 10 लॉन्च करू शकते. अनेक दिवसांपासून फोन बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार गॅलेक्सी नोट 10 मध्ये चार रियर कॅमेरा सेटअप असेल. याआधी कंपनीने आपल्या सॅमसंग गॅलेक्सी ए9 आणि गॅलेक्सी एस10 5जी मध्ये 4 रियर कॅमेरा दिले आहेत. आता समोर आलेल्या एका नव्या रिपोर्टनुसार फोन मध्ये कोणत्याही प्रकारचे फिजिकल बटण नसेल.

साउथ कोरियन पब्लिकेशन ईटीन्यूज द्वारा समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 एक बटणलेस फोन असेल, ज्यात कोणत्याही प्रकारचे बटण नसेल. डिवाइस मध्ये पावर बटणच्या जागी पण अल्टरनेट इंटरफेस असेल. तसेच फोन ऑन व ऑफ करण्यासाठी फिजिकल ऐज आवळाव लागेल. वॉल्यूम बटण वापरण्यासाठी यूजर्सना जेस्चर वापर करावा लागेल. ज्याच्या मदतीने आवाज कमी जास्त करता येईल.

हे देखील वाचा: सॅमसंगला मागे टाकण्यासाठी आले हुआवई पी30 आणि पी30 प्रो, चार सेंसर सह प्रोफोशनल कॅमेऱ्या प्रमाणे क्लिक करता येतील फोटो

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 19.5:5 च्या एस्पेक्ट रेशियो सह 6.66-इंचाचा इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक पण दिला जाणार नाही. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी नोट सोबत मिळणाऱ्या S Pen मध्ये पण सॅमसंग एक कॅमेरा यूनिट देऊ शकते. सॅमसंग ने एस पेन मधील कॅमेरा डिजाइन पण काही महिन्यांपूर्वी पेटेंट केली होती. पेटेंट नंतर चर्चा झाली आहे कि सॅमसंग हि टेक्नॉलॉजी आपल्या अपकमिंग गॅलेक्सी नोट डिवाइस मध्ये देऊ शकते.

विशेष म्हणजे आपल्या फ्लॅगशिप फॅबलेट सोबत कंपनी आपल्या गो एडिशन फोन बद्दल पण चर्चेत आहे. सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आले होते ज्यात सांगण्यात आले होते कि हि कोरियन कंपनी गॅलेक्सी ए सीरीजच्या स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए2 कोर वर काम करत आहे. मागे गॅलेक्सी ए2 कोर वाई-फाई सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता, ज्यावरून स्पष्ट झाले होते कि सॅमसंग लवकरच गॅलेक्सी ए2 कोर टेक मंचावर सादर करू शकते.

हे देखील वाचा: भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा स्पेस शक्ती देश, लॉन्च केला अवकाशात मारा करणारा मिसाईल

हा फोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गॅलेक्सी ए2 कोर ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला आहे, फोनचे चार नवीन वेरिएंट समोर आले आहेत. हे चार वेरिएंट फोनचे वेगवेगळे मॉडेल आहेत जे लवकरच बाजारात येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here