Realme ने काही दिवसांपूर्वी आपली ‘एक्स50 सीरीज’ टेक मंचावर सादर केला होता, ज्यात आतापर्यंत Realme X50, Realme X50 Pro, Realme X50m आणि Realme X50 Player Edition स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि रियलमी या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे जो Realme X50t नावाने लॉन्च केला जाईल. वेईबो वर या फोनची माहिती देण्यात आली होती. तसेच आता रियलमीचा हा शानदार फोन गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट झाला आहे.
Realme X50t गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. या वेबसाइट वर रियलमी एक्स50टी च्या नावासह याचा मॉडेल नंबर RMX2052CN पण लिहिण्यात आला आहे. लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि रियलमी एक्स50टी पण या सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे 5G कनेक्टिविटी सह लॉन्च होईल.
Realme X50t 5G
गूगल प्ले कंसोल वर समजले आहे कि रियलमी एक्स50टी स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या लिस्टिंग मध्ये स्क्रीन साईजची माहिती तर नाही मिळाली पण असे सांगण्यात आले आहे कि Realme X50t चा डिस्प्ले 480DPI ला सपोर्ट करेल. या वेबसाइट वर फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे.
Realme X50t गूगल प्ले कंसोल वर 6 जीबी रॅम सह लिस्ट झाला आहे. इथे स्पष्ट झाले आहे कि रियलमीचा हा आगामी 5G फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765 चिपसेट वर लॉन्च केला जाईल आणि फोन मध्ये ग्राफिक्ससाठी एड्रेनो 620 जीपीयू मिळेल. फोनची कशी असेल याची अजूनतरी निश्चित माहिती मिळाली नाही पण आशा आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च होईल.
काही दिवसांपूर्वी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आलेल्या पोस्ट वरून समजले होते कि Realme X50t 5G ची थिकनेस 9.3mm आणि वजन 202 ग्राम असेल. तसेच फोन फक्त तीन बँड्स n41,n78 आणि n79 bands ला सपोर्ट करेल. या लीक मध्ये रियलमी एक्स50 टी मध्ये सीरीजच्या Realme X50m स्मार्टफोन प्रमाणे डुअल पंच-होल डिस्प्ले दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
लीकनुसार Realme X50t मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल आणि यात प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. तसेच वर टिप्सटरने असा खुलासा केला आहे कि रियलमी एक्स50टी मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल, या लीक मध्ये पण फोन मधील बॅटरीची क्षमता सांगण्यात आलेली नाही.
रियलमी एक्स50 5जी वीडियो
















