OPPO Reno5 Pro+ 5G वेबसाइट वर लिस्ट, 24 डिसेंबरला लॉन्च होईल हा पावरफुल फोन

OPPO ने अलीकडेच आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत लेटेस्ट ‘रेनो 5 सीरीज’ टेक मंचावर सादर केली आहे. या सीरीजची सुरवात ओपोच्या होम मार्केट चीन पासून झाली आहे जिथे OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही डिवायसेज आणण्यासोबतच कंपनीने अशी घोषणा पण केली होती कि सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडला जाईल जो OPPO Reno 5 Pro+ नावाने 24 डिसेंबरला लॉन्च होईल. तसेच आता हा फोन बाजारात येण्याआधी गीकबेंच वर लिस्ट झाला आहे.

OPPO Reno 5 Pro+ चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर सर्टिफाइड करण्यात आला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग कालची म्हणजे 14 डिसेंबरची आहे जिथे फोन OPPO PDRM00 मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे ज्यात अँड्रॉइड ओएस पासून रॅम आणि प्रोसेसर पर्यंतचा समावेश आहे. OPPO Reno 5 Pro+ ला इथे सिंगल-कोर मध्ये 886 आणि मल्टी-कोर मध्ये 3036 स्कोर देण्यात आला आहे.

गीकबेंच वर समोर आले आहे कि ओपो रेनो 5 प्रो प्लस सीरीजच्या इतर फोन्स प्रमाणे लेटेस्ट अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल. इथे फोन मध्ये देण्या आलेल्या प्रोसेसरचे कोडनेम ‘Kona’ लिहिण्यात आले आहे जो क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट कडे इशारा करतो. लिस्टिंग मध्ये OPPO Reno 5 Pro+ चा 8 जीबी रॅम वेरिएंट समोर आला आहे पण फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल कि नाही याचा खुलासा झाला नाही. ओपोने आधी सांगितले आहे कि हा फोन black आणि gradient blue कलर मध्ये लॉन्च होईल.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here