Redmi Note 10 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. 91मोबाईल्सने सर्वातआधी माहिती दिली होती कि रेडमी नोट 10 फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. लॉन्च टाइमलाइन व्यतिरिक्त या हँडसेटच्या रॅम व स्टोरेज वेरियंटबाबत पण आम्ही कालच माहिती दिली होती. आता मॉडेल नंबर M2101K7AI सह हा स्मार्टफोन BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. याआधी मॉडेल नंबर M2101K6I सह BIS वर रेडमी नोट 10 प्रो लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशनवरून स्पष्ट झाले आहे कि फोन लॉन्च होण्यास थोडाच वेळ शिल्लक आहे.
BIS सर्टिफिकेशन साइट व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी असाच मॉडेल (M2101K7AG) असेलला एक फोन FCC वेबसाइटवर दिसला होता. या लिस्टिंगवरून रेडमी नोट 10 च्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला होता. पण अजूनही रेडमी नोट 10 सीरीजच्या लॉन्च डेटची माहिती समोर आली नाही.
हे देखील वाचा : Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी
Redmi Note 10 चे लीक स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या लीकनुसार रेडमी नोट 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता कि रेडमी नोट 10 मध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. दुसरीकडे रेडमी नोट 10 प्रो मध्ये 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा : Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान
कलर ऑप्शन पाहता Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. आतापर्यंत फोनच्या किंमतीबद्दल कोणताही लीक आला नाही. पण, सांगण्यात आले होते कि Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असू शकते.
शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ















