आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स

Highlights

  • आधार कार्ड हरवल्यावर सहज दुसरं डाउनलोड करता येतं.
  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाइल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे.
  • नवीन आधार कार्डसाठी ऑफलाइन देखील अर्ज करता येतो.

जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घाबरून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं हे सांगणार आहोत. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये आधार कार्डचा दुरुपयोग कसा केला जाऊ शकतो ते देखील समजेल. आधार कार्ड हरवल्यास दुसरं आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन घर बसल्या दुसरं आधार कार्ड डाउनलोड करता येईल. जर तुम्हाला ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यास अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला ऑफलाइन दुसऱ्या आधार कार्डसाठी कसा अर्ज करायचा हे देखील सांगणार आहोत.

आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं?

आधार कार्ड हरवल्यावर तुम्ही ऑनलाइन नवीन कार्ड डाउनलोड करू शकता. ह्यासाठी आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही आधार क्रमांक विसरला असाल तरीही देखील रजिस्टर नंबरवरून आधार कार्ड डाउनलोड करता येईल. तसेच नंबर लिंक नसेल तर डुप्लीकेट आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करता येतो.

आधार नंबर कसा शोधायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम आधारच्या ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid वर जा.

स्टेप 2 : तिथे आधार क्रमांक सिलेक्ट करून, रजिस्टर्ड मोबाइल आणि कॅप्चा कोड टाकून ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो सबमिट केल्यावर तुमच्या मोबाइल नंबरवर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर पाठवला जाईल.

आता तुम्हाला आधार कार्ड नंबर मिळाला आहे. त्यामुळे सहज आधार कार्ड डाउनलोड करता येईल. पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आधार कार्ड डाउनलोड करण्याची माहिती देण्यात आली आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर तुम्ही थेट ही प्रोसेस करू शकता.

आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं?

स्टेप 1 : आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar ओपन करा.

स्टेप 2 : तिथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : पुढील पेजवर ओटीपी व्हेरिफाय करून ‘डाउनलोड’ वर क्लिक करा. काही सेकंदात आधार कार्ड डाउनलोड होईल.

ऑफलाइन डुप्लीकेट आधार कार्ड कसं बनवायचं?

जर तुमच्या आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला डुप्लीकेट आधार कार्डसाठी आधार सेंटर जावं लागेल. तुमच्या जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जा आणि तिथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल त्यात आवश्यक माहिती भरा. सोबत एक ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.

तुमचं बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर नवीन आधार कार्डसाठी विनंती करता येईल. तसेच तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देखील रजिस्टर करू शकता. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन आधार सर्व्हिसचा लाभ घेता येईल. काही दिवसांत तुमचं आधार कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल.

आधार कार्डचा गैरवापर करता येतो का?

आधार कार्ड हरवल्यावर त्याचा गैरवापर करता येत नाही. सरकारी किंवा खाजगी सर्व्हिस जसे की सिम कार्ड खरेदीसाठी आधार व्हेरिफाय करावं लागतं. ज्यासाठी ऑनलाइन, ओटीपी किंवा बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याव्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड कोणीही वापरू शकत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. परंतु तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात कार्ड हरवल्याची तक्रार करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here