आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे असं जाणून घ्या; पाहा नवीन नंबर करण्याची अपडेट करण्याची पद्धत

Highlights

  • आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर कसा जाणून घ्यायचा?
  • आधार कार्डमध्ये नवीन मोबाइल नंबर लिंक कसा होतो?
  • जुना मोबाइल नंबर बंद असेल तर आधार कार्डशी नवीन नंबर कसा लिंक होईल?

आधार कार्ड भारतीयांसाठी एक महत्वाचं डॉक्यूमेंट आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी असो किंवा घर, तसेच बँकेत अकाऊंट ओपन करायचं असो किंवा शाळेत अ‍ॅडमिशन करायचं असेल तरी Aadhaar Card विना अशक्य आहेत या गोष्टी. आज आधार कार्ड संबंधित बऱ्याच सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यासाठी तुमचं आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर विसरला असाल किंवा नवीन मोबाइल नंबर आधारशी लिंक करू इच्छित असाल तर इथे आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.

आधार कार्डशी लिंक आलेल्या मोबाइल नंबरची माहिती

Aadhaar Card शी लिंक मोबाइल नंबर ऑनलाइन घर बसल्या जाणून घेता येतो. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा.

स्टेप 1 – UIDAI च्या ऑफिशियल वेबसाइटवर My Aadhaar वर लॉगइन करा.

स्टेप 2 – इथे ‘व्हेरिफाय आधार’ वर क्लिक करा.

स्टेप 3 – आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरल्यानांतर सबमिटवर क्लिक करा.

स्टेप 4 – पुढील पेजवर तुम्हाला आधार कार्डची माहिती मिळेल. तसेच आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील. अशाप्रकारे तुम्ही आधार कार्डवरील रजिस्टर मोबाइल नंबर जाणून घेऊ शकता.

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर कसा लिंक करायचा

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर लिंक करणं सोपं आहे. तुम्ही घर बसल्या हे सहज तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरवरून करू शकता.

स्टेप 1 – सर्वप्रथम UIDAI ची ऑफिशियल वेबसाइट https://uidai.gov.in/ ओपन करा आणि My Aadhaar मध्ये लॉगइन करा. आता “Aadhaar Services” वर क्लिक करा.

स्टेप 2 – आता तुम्हाला “Update your Mobile Number” लिंक दिसेल.

स्टेप 3 – ओपन झालेल्या नवीन पेजवर तुम्हाला तुमचा 12-अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून “Send OTP” बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्स मोबाइल नंबरवर OTP मिळेल तो Submit करा.

स्टेप 4 – OTP सबमिट केल्यावर तुम्हाला नवीन मोबाइल नंबर विचारला जाईल तो द्या आणि “Submit” वर क्लिक करा.

त्यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या नवीन मोबाइल नंबर वर UIDAI करून ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन कोड येईल आणि तुमचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक होईल.

जुना नंबर बंद झाल्यास अशाप्रकारे आधारशी नवीन मोबाइल नंबर लिंक करा

जर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला जुना मोबाइल नंबर बंद असेल किंवा हरवला असेल तर तुम्हाला आधार कार्डवर नवीन नंबर लिंक करण्यासाठी जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल. आधार सेंटरवर तुम्हाला तुमचा ऑरिजनल आधार कार्ड आणि एक ओळखपत्र (पॅन कार्ड, वोटर आयडी किंवा पासपोर्ट) घेऊन जावं लागेल. आधार कार्ड अपडेशन किंवा करेक्शन फॉर्म भरून तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये नवीन मोबाइल नंबर रजिस्टर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here