365 दिवस चालणारा Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 1799 रुपये

Highlights

  • प्लॅनमध्ये FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
  • ह्या रिचार्जमध्ये 365 दिवस वैधता, फ्री कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.
  • हा रिचार्ज तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय ठेवेल.

जर तुम्ही Airtel कंपनीचे ग्राहक असाल आणि दरमहा रिचार्ज करण्याचे झंझट नको असेल तर तुमच्यासाठी ह्या आर्टिकलमध्ये चांगला उपाय आहे. आज आम्ही या लेखात एयरटेलच्या एका अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचं सिम एक वर्षभर सक्रिय राहील आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हा कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन आहे.

रोजचा खर्च फक्त 4.9 रुपये

एयरटेलच्या ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्या खर्च विभागल्यास दिवसाला फक्त 4.9 रुपये मोजावे लागतील. भारतातील दुसऱ्या मोठ्या टेलिकॉम कंपनीकडे 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन कमी खर्चात 365 दिवसांची वैधता देतो. त्यामुळे ज्या युजर्सकडे एयरटेल सेकंडरी सिम म्हणून आहे आणि आपलं सिम वर्षभर सक्रिय ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.

एयरटेल प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स

  • ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.
  • इंटरनेट वापरासाठी युजर्सना एकूण 24 GB डेटा मिळतो.
  • इतकेच नव्हे तर ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेली डेटा लिमिट मिळत नाही.
  • प्लॅनमध्ये मिळणारा 24 GB इंटरनेट डेटा 365 दिवसांत कधीही वापरता येतो.
  • प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एकूण 3600 SMS ची सुविधा पण मिळेल.
  • ह्यात अपोलो 24/7 सर्कल, विंक म्यूजिक आणि फ्री हॅलोट्यूनची सुविधा दिली जात आहे.

नोट : जर तुम्ही मोठी वैधता असलेला एयरटेलचा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुम्ही एयरटेलच्या ह्या प्लॅनची निवड करू शकता. डेटा संपल्यावर अ‍ॅड डेटा पॅकचा वापर करता येईल. तसेच सतत वायफायशी कनेक्टेड राहणाऱ्या युजर्ससाठी देखील हा एक चांगला प्लॅन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here