Airtel ने वाढवली आपल्या प्लान्सची किंमत, इथे बघा सर्व प्लान्स सविस्तर

टेलीकॉम यूजर्स साठी आता पर्यंत उपलब्ध असलेल्या स्वस्त प्लान्सच्या किंमती लवकरच वाढणार आहेत. जियो, वोडाफोन-आइडिया सोबत एयरटेलच्या प्रीपेड ग्राहकांच्या खिश्यावर पण अतिरिक्त बोजा पडणार आहे. वोडाफोन-आइडिया आणि एयरटेलने प्रीपेड मोबाईल सेवांचे दर 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा रविवारी करून आपल्या वेगवेगळ्या प्लॅन्सच्या वाढलेल्या किंमतींची माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला इथे एयरटेलच्या नवीन किंमतींची माहिती देत आहोत.

सर्वात आधी बोलूया 2 दिवसांची वैधता सह येणाऱ्या नवीन प्लानच्या किंमत आणि मिळणाऱ्या फायद्यांबद्दल. कंपनीने 19 रुपयांच्या प्लानच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही. या प्लानची किंमत आता पण 19 रुपये आहे, ज्यात तुम्हाला प्रतिदिन 100SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 150एमबी डेटा मिळतो.

28 दिवस वैधता सह येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे तर कंपनीने 35 रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून 49 रुपये केली आहे. या प्लान मध्ये तुम्हाला आता 38.52 रुपयांचा टॉकटाइम आणि 100एमबी डेटा मिळेल. तसेच 65 रुपयांच्या प्लान साठी आता 79 रुपये द्यावे लागतील, ज्यात 63.95 रुपयांचा टॉकटाइम आणि 200एमबी डेटा दिला जात आहे. सोबतच कंपनीच्या 128 रुपयांच्या प्लान साठी 3 डिसेंबर नंतर 148 रुपये द्यावे लागतील, ज्यात अनलिमिटेड कॉलिंग, 300एसएमएस, 2जीबी डेटा आणि एयरटेल एक्सट्रीम, विंक आणि हॅलो ट्यून्सचा लाभ मिळेल.

169/199 रुपयांच्या प्लान साठी यूजर्सना आता 248 रुपये द्यावे लागतील. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस आणि 1.5जीबी प्रतिदिन या हिशोबाने डेटा मिळेल. तर 28 दिवसांची वैधता असलेला 249 रुपयांचा प्लान तीन तारखेपासून 298 चा होईल. या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस प्रतिदिन आणि 2जीबी डेटा प्रतिदिन मिळेल.

तसेच कंपनीचा 82 दिवसांची वैधता असलेल्या प्लानची किंमतीत जवळपास 33.48 टक्के वाढली आहे. याची किंमत आता 399/448 रुपयांवरून 598 रुपये आणि 499/558 रुपयांच्या प्लानची किंमत वाढून 698 झाली आहे. या दोन्ही प्लानची वैधता आता 82 दिवसांच्या ऐवजी 84 दिवस झाली आहे. तसेच 598 च्या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस प्रतिदिन आणि 1जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. तर 698 च्या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस प्रतिदिन आणि 2जीबी डेटा प्रतिदिन मिळेल.

एयरटेलने वार्षिक प्लानची किंमतीत 41.14 टक्के वाढवली आहे. कंपनीच्या 1,699 रुपयांचा प्लान 2,398 रुपयांचा केला आहे. कंपनीचा मर्यादित डेटा असलेला वार्षिक प्लान आता 998 रुपयांच्या ऐवजी तीन तारखेपासून 1,498 रुपयांचा होईल.

स्मार्ट पॅक

35 रुपयांच्या टॅरिफची किंमत वाढवण्याआधी या प्लान मध्ये 26.66 रुपयांच्या टॉक टाइम आणि 100MB डेटा मिळत होता. आता या प्लानची किंमत 49 रुपये झाली आहे. आता या प्लान मध्ये आता 38.53 रुपयांच्या टॉक टाइम सह 100MB डेटा मिळतो. 65 रुपयांमध्ये येणारा एयरटेलचा प्लान आता 79 रुपयांचा झाला आहे. प्लान झाल्यानंतर यात आता 28 दिवसांची वॅलिडिटी सह 63.95 रुपयांचा टॉक टाइम आणि 200MB डेटा दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here