जियोला मात देण्यासाठी एयरटेलची नवी चाल; मोफत हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन असलेल्या प्लॅनचं पुनरागमन

नोव्हेंबरमध्ये Airtel नं Disney+ Hotstar सब्सस्क्रिप्शनसह येणारे काही प्लॅन्समध्ये केले होते. कंपनीनं फक्त दोनच प्लॅन्स आपल्या पोर्टफोलियोमध्ये ठेवले होते ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार OTT चा आनंद घेता येत होता. परंतु आता एयरटेलनं बंद केलेल्या प्लॅन्स पैकी दोन प्लॅन्स पुन्हा सुरु केले आहेत. नोव्हेंबरपासून आतापर्यंत एयरटेलच्या 3359 आणि 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन मोफत मिळतं होतं, परंतु आता 399 आणि 839 रुपयांच्या प्लॅन्सचं पुनरागमन झालं आहे.

एयरटेलचा 399 रुपयांचा प्लॅन

399 रुपयांचा एयरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टारचं मोबाइल सब्सस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. या प्लॅनमधील ओटीटी सब्सस्क्रिप्शन तीन महिन्याच्या वैधतेसह येतं. तसेच 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2.5 जीबी डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळतात, या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. त्याचबरोबर या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहक विंक म्युजिक, फ्री हॅलो ट्यून, फास्ट टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि अपोलो 24/7 सर्कल असे बेनिफिट मिळतात. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोन हवा? मग थांबा! Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येतोय

एयरटेलचा 839 रुपयांचा प्लॅन

एयरटेलनं 839 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील पुन्हा सुरु केला आहे, ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल सब्सस्क्रिप्शन मोफत मिळतं. या प्लॅनमध्ये 2 जीबी डेली डेटा, अनिलिमीटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोजचे 100 एसएमएस मोफत मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देत आहे. अन्य बेनिफिट्स पाहता एयरटेलच्या 839 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचं तीन महिन्यांचं सब्सस्क्रिप्शन, एक्सस्ट्रीम अ‍ॅपचा 84 दिवसांचा अ‍ॅक्सेस, रिवॉर्ड्समिनी सब्सस्क्रिप्शन, अपोलो 24/7 सर्कल, मोफत हॅलो ट्यून, आणि विंक म्युजिकचा आनंद घेता येईल.

एयरटेलचा 499 रुपयांचा प्लॅन

499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेली 100 SMS आणि डेली 2GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये फक्त मोफत फ्री डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन मिळत नाही तर सोबत विंक म्यूजिक, हेल्लो ट्यून्ससह फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि तीन महिन्यांसाठी अपोलो 24×7 चा लाभ घेता येतो. हे देखील वाचा: 9 हजारांच्या रेंजमध्ये 7000mAh ची बॅटरी दणकट बॅटरी असलेला फोन; 11GB RAM असलेल्या फोनच्या किंमतीत कपात

एयरटेलचा 3359 रुपयांचा प्लॅन

तसेच 3359 रुपयांचा प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर या रिचार्जमध्ये युजर्सना Amazon Prime Video Mobile Edition सब्सक्रिप्शन फ्री मिळतं. तसेच प्लॅनमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचा लाभ घेता येतो. थोडक्यात या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोफत सब्सस्क्रिप्शन दिलं जात आहे. तसेच प्लॅनमध्ये डेली 2.5GB डेटा, प्रतिदिन 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉल्ससह 365 दिवसांची वैधता मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here