149 रुपयांमध्ये 15 पेक्षा जास्त OTT आणि मोफत डेटा; Airtel नं आणला नवा स्वस्त प्लॅन

Highlights

  • एयरटेलनं गुपचूप 149 रुपयांचा डेटा पॅक सादर केला आहे.
  • Airtel Rs 149 मध्ये ग्राहकांना 1GB डेटा मिळतो.
  • हा एक डेटा पॅक आहे त्यामुळे यात वैधता आणि फ्री कॉलिंगचा नाही.

Bharti Airtel नं कोणताही गाजावाजा न करता ग्राहकांना खुश करत एक New Prepaid Recharge Plan सादर केला आहे. Airtel नं नवीन Rs 149 plan डेटा पॅक म्ह्णून आणला आहे. या पॅकमध्ये इंटरनेट डेटा व्यतिरिक्त OTT (over-the-top) बेनिफिट्सचा लाभ देखील मिळत आहे. जर तुम्ही एक स्वस्त Airtel Data Plan शोधत असाल तर हा रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. पुढे आम्ही तुम्हाला Rs 149 plan ची संपूर्ण माहिती दिली आहे.

Airtel Rs 149 Plan

Airtel Rs 149 plan बद्दल बोलायचं झालं तर रिचार्जमध्ये ग्राहकांना एकूण 1GB डेटा मिळतो. एक डेटा पॅक असल्यामुळे या रिचार्जमध्ये कोणतीही वैधता किंवा फ्री कॉलिंगचा लाभ ग्राहकांना मिळणार नाही. तसेच रिचार्जची वैधता तुमच्या मेन प्लॅनवर अवलंबून असेल. म्हणजे तुमच्याकडे बेस प्लॅन 28 दिवसांचा असेल तर हा प्लॅन देखील 28 दिवस चालेल. हे देखील वाचा: स्वस्तात 6GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी; POCO C55 च्या भारतीय लाँचचा मार्ग मोकळा

1GB डेटा व्यतिरिक्त युजर्सना 30 दिवसांचे Airtel Xstream Premium चे सब्सक्रिप्शन मिळेल. Xstream Premium कंपनीचा एक अ‍ॅग्रीगेटेड ओटीटी कंटेंट प्लॅटफॉर्म आहे जो युजर्सना एका अ‍ॅप मध्ये 15+ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा कटेंट उपलब्ध करवून देतो. म्हणजे तुम्ही तुमच्या टॅबलेट, स्मार्टफोन किंवा डेस्कटॉपवर एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियममधील कंटेंट सहज पाहू शकता.

जरी हा प्लॅन डेटा अ‍ॅड ऑन म्हणून कंपनीनं सादर केला असला तरी हा एक ओटीटी सब्सस्क्रिप्शन प्लॅन आहे, ज्यात 1GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनच्या माध्यमातून एयरटेलला आपली एक्सस्ट्रीम प्रीमियम सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे असं दिसतं आहे. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

जास्त डेटासाठी 148 रुपयांचा रिचार्ज

हा डेटा पॅक त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे ज्यांना कमी डेटासह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहायचा आहे. जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल आणि ओटीटी बेनिफिट्सची गरज नसेल तर तुम्ही 148 रुपयांचा डेटा पॅक निवडू शकता. या प्लॅनसह युजर्सना 15GB डेटा मिळतो आणि या प्लॅनची वॅलिडिटी युजरच्या बेस प्लॅनवर अवलंबून असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here