POCO C55 च्या भारतीय लाँचची कंपनीनं दिली माहिती; फ्लिपकार्टवरून होणार विक्री

Highlights

  • POCO C55 इंडिया लाँच कंपनीनं ऑफिशियली टीज केला आहे.
  • हा फोन चीनमध्ये आलेल्या Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.
  • पोको सी55 मध्ये 50MP Camera आणि MediaTek Helio G85 दिला जाऊ शकतो.

पोको बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन घेऊन येईल जो पोको सी55 नावानं मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच आज पोको इंडियानं स्वतःहून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं टीज केलं आहे की भारतात POCO C55 लाँच केला जाणार आहे आणि याची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल. या फोनमध्ये 50MP Camera, MediaTek Helio G85 आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.

पोको इंडियानं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून माहिती दिली आहे की कंपनी भारतात POCO C55 लाँच करणार आहे. ब्रँडकडून अद्याप लाँच डेटची माहिती देण्यात आली नाही परंतु आशा आहे की फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला पोको सी55 देशात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. फोनची इतर माहिती अजून समोर अली नाही, परंतु अशी चर्चा आहे की हा पोको फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग

POCO C55चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 50MP Camera
  • 6.71″ HD+ Display
  • MediaTek Helio G85
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 10W 5,000mAh Battery

पोको सी55 जर खरंच चीनमध्ये आलेल्या रेडमी 12सीचा ही रीब्रँडेड व्हर्जन असेल तर यातील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावता येईल. रेडमी 12सी चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या स्क्रीनवर 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

Redmi 12C 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो आणि हा चिपसेट पोको सी55 मध्ये देखील मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड आधारित मीयुआय 13 वर चालतो. चीनमध्ये हा फोन 4जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128 जीबी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे आणि हे मॉडेल भारतात येऊ शकतात. हे देखील वाचा: 108Km रेंज सह येतेय 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर! लवकरच होणार लाँच

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here