जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल, 1 जीबी स्पीड असलेलं इंटरनेट; Jio सादर करणार ‘हे’ शानदार प्रॉडक्टस

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Mukesh Ambani यांनी आज 45th Annual General Meeting (RIL) च्या मंचावरून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्स जियोनं आपल्या 5G Network रोलआउटची घोषणा केली आहे जे दिवाळीपासून देशात सुरु होईल. कंपनीनं या सेवेला Jio True 5G असं नाव दिलं आहे जे पूर्णपणे Made in India असेल. Jio 5G Service लाँच करण्यासोबतचा अंबानींनी सांगितलं आहे की Jio आणि Google सोबत जगातील सर्वात स्वस्त 5G smartphone लाँच करणार आहे, तसेच अन्य दमदार प्रॉडक्टस देखील जगासमोर ठेवण्यात आले आहेत.

Ultra-affordable 5G Smartphone

कंपनी भारतात आपला अल्ट्रा अफॉर्डेबल 5जी स्मार्टफोन सादर करणार आहे आणि यासाठी कंपनीनं दिग्गज टेक कंपनी Google सह भागेदारी केली आहे. या भागेदारी अंतर्गत एकापेक्षा जास्त 5जी मोबाइल मॉडेल लाँच करू शतके. तसेच जियो 5जी स्मार्टफोनसह Google Cloud सर्व्हिस देखील जियो युजर्सना मिळेल. Jio 5G Smartphone पूर्णपणे Made in India असेल.

रिलायन्स जियोने आपल्या 5जी फोन व 5जी नेटवर्कसाठी जगातील अनेक बड्या टेक कंपन्यांशी हात मिळवणी केली आहे गुगल जियोसाठी 5जी स्मार्टफोन डेव्हलप करेल तर Meta, Microsoft, Intel, Ericsson, Nokia, Samsung, Cisco आणि Qualcomm देखील Jio True 5G ला सहायता करतील.

1Gbps स्पीड देणार जियो ट्रू 5G

मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 5G च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आणि यामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. 5G चा वापर ब्रॉडबँडसाठी करण्यात येईल हे जगातील सर्वात मोठं आणि प्रभावशाली 5G नेटवर्क असेल. कंपनीची 5G सेवा पुढील महिन्यात दिवाळीच्या निमित्ताने सुरु केली जाईल. यह सर्वप्रथम दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत 5G सर्व्हिस सुरु केल्यावर पुढील वर्षाच्या डिसेंबर पर्यंत या सेवेचा प्रसार भारतभर होईल. ‘जियो ट्रू 5G’ सेवा 1Gbps पेक्षा जास्त स्पीड देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. युजर्सना प्रथमच अल्ट्रा-लो लेटेंसीचा आनंद घेऊ शकतील.

असं वापरता येईल जियो एयर फायबर

ब्रॉडबँड कनेक्शन वापरणाऱ्या युजर्सना अजूनही केबल आणि वायर्सचं झंझट असतं. परंतु जियो एयर फायबरच्या युजर्सना फक्त एक डिवाइस घरात किंवा ऑफिसमध्ये प्लग-इन करावं लागेल. ज्यामुळे ग्राहकांना सध्या उपलब्ध असलेल्या सोल्युशन्स पेक्षा जास्त स्पीड मिळेल आणि वे HD कंटेंट स्ट्रीम करता येईल.

Jio Cloud PC

Cloud PC कोणत्याही मोठ्या हार्डवेयरविना हा पीसी वापरता येईल. हा एक वर्चुअल पीसी आहे. ही सेवा वेगवान 5G नेटवर्क स्पीडमुळे यूजर्सना रिमोट सर्वर लोकेशनवरून देखील सर्व कंप्यूटेशंस स्ट्रीम करण्यास मदत करेल. यात वारंवार पीसी अपग्रेड करण्याचं झंझट नसणार आहे. तसेच यामुळे एक नव्हे एकाच वेळी अनेक पीसीची ताकद वापरू शकता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here