iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट

iQOO Z3 चा फोटो

Vivo चा सब ब्रँड iQOO ने काही दिवसांपूर्वी भारतात iQOO 7 सीरीज भारतात लॉन्च केली होती. आता कंपनी भारतात अजून एक स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन मिड–रेंज सेगमेंटमध्ये सादर केला जाईल जो iQOO Z3 नावाने येऊ शकतो. या स्मार्टफोनला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे आता हा स्मार्टफोन Indian IMEI डेटाबेसमध्ये मॉडेल नंबर V2073A सह लिस्ट झाला आहे. यावरून माहिती मिळाली आहे कि iQOO Z3 भारतात लवकरच लॉन्च होऊ शकतो. iQOO Z3 स्मार्टफोन कंपनीने मार्चमध्ये चीनमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, Snapdragon 768G SoC, 55W फास्ट चार्जिंग, 64MP प्राइमेरी कॅमेऱ्यासह सादर केला आहे. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन iQOO चा भारतात लॉन्च होणारा सर्वात स्वस्त फोन असू शकतो. या स्मार्टफोनची मार्केटमध्ये थेट टक्कर Realme आणि Xiaomi च्या स्मार्टफोनशी होणार आहे. (iQOO Z3 registered on the Indian IMEI database India launch soon)

iQOO Z3 स्पेसिफिकेशन्स

iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, रिजोल्यूशन 2408× 1080 पिक्सल, आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. तसेच हा डिस्प्ले HDR10+ आणि 96 percent NTSC Colour Gamut सपोर्टसह येतो. iQOO च्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 768G SoC सह Adreno 620 GPU, 8GB LPDDR4x RAM, आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित iQOO UI 1.0 कस्टम स्किनवर चालतो.

हे देखील वाचा : Xiaomi चा लो बजेटमध्ये सर्वात बडा डाव तयार, 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 10S भारतात होईल 13 मेला लॉन्च

iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आणि 55W फास्ट चार्जर देण्यात आला आहे. iQOO च्या या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कनेक्टिविटीसाठी 5G SA/NSA, 4G VoLTE, WiFi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.1, GPS/GLONASS, USB Type-C देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Z Fold3 मध्ये असू शकतो अंडर डिस्प्ले कॅमेरा, S Pen आणि नवीन कॅमेरा डिजाइन

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता iQOO Z3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

iQOO Z3 किंमत

iQOO Z3 5G स्मार्टफोन चीनमध्ये तीन वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा पहिला वेरिएंट 6GB+128GB चा आहे जो 1,699RMB (जवळपास 18,800 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 8GB+128GB वेरिएंट 1,799 RMB (जवळपास 20,000 रुपये) आणि 8GB+256GB वेरिएंट 1,999 RMB (जवळपास 22,200 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here