8GB रॅम असलेला Xiaomi Mi 11 Lite वेबसाइटवर लिस्ट, 5G च्या ताकदीसह लवकरच होईल लॉन्च

Xiaomi ने साल 2020 च्या शेवटी Mi 11 सादर केला होता. या फोनच्या लॉन्चनंतरपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी Mi 11 Lite स्मार्टफोन सादर करू शकते. पण आतापर्यंत फोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण आतापर्यंत अनेक लीक्समध्ये या फोनचा उल्लेख झाला आहे. फोनच्या डिजाइन सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सची पण माहिती लीक्समध्ये समोर आली आहे. आता गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये शाओमीचा मी11 लाइट 5G मॉडेल नंबर M2101K9AG सह स्पॉट झाला आहे, ज्यात काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. याआधी फोन या मॉडेल नंबरसह FCC आणि IMEI लिस्टिंगमध्ये दिसला आहे. (mi 11 lite google play certification with android 11 snapdragon 765g)

Xiaomi Mi 11 Lite 5G चे स्पेसिफिकेशन कसे असतील?

Google Play Console लिस्टिंगवरून समोर आले आहे कि Xiaomi Mi 11 Lite 5G चा मॉडेल नंबर M2101K9G असेल. तसेच फोनचे कोडनेम Renoir दाखवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 8जीबी रॅम आणि Snapdragon 765G SoC असेल. तसेच, फोनच्या 4G वेरिएंटबद्दल वियतनामच्या यूट्यूबरने गेल्या महिन्यात आपल्या चॅनेलवर एक व्हिडीओ शेयर केला होता, ज्यात डिजाइन सोबतच स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली होती.

हे देखील वाचा : एक किंवा दोन नाही तर 10 Redmi फोन्सची किंमत झाली कमी, हि आहे खरेदीची सुवर्णसंधी

FCC लिस्टिंगवर झाला खुलासा

गुगल प्ले कंसोलच्या आधी Xiaomi Mi 11 Lite FCC ला सर्टिफिकेशन मिळाले होते, जिथे समजले होते कि फोनमध्ये 6GB + 64GB स्टोरेज आणि 6GB + 128GB मेमरी स्टोरेज असेल. तसेच सांगण्यात आले होते कि Mi 11 Lite मध्ये 4150mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह मिळेल.

या सर्टिफिकेशन साइटवर पण लिस्ट झाला Mi 11 Lite

फोन BIS, IMDA, NBTC, EEC आणि Bluetooth SIG लिस्टिंगवर पण दिसला आहे. तसेच फोनचे रेंडर्स गेल्या महिन्यात एका लीक मध्ये समोर आले होते, ज्यात फोनच्या फुल डिजाइनची माहिती देण्यात आली होती.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान

Mi 11 Lite 4G

Xiaomi Mi 11 Lite 4G चे लीक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात फुलएचडी+ डिस्प्ले असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार हि स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनलेली असू शकते, त्यामुळे फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार नाही. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनलवर पावर बटनमध्ये दिला जाऊ शकतो.

लीकनुसार शाओमी मी 11 लाइट अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल, त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. मार्केटमध्ये POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेटसह येतो. लीकमध्ये Xiaomi Mi 11 Lite 6 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे त्याचबरोबर 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here