सहज बसेल तुमच्या बजेटमध्ये! 5GB RAM आणि 5,000mAh Battery सह आला स्वस्त Vivo Y16

Vivo Y16 India Launch Price 12499 Vivo Mobile Phone

विवो कंपनीनं आपल्या वाय सीरीजमध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीनं या सीरिजमध्ये आता नवीन Vivo Y16 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मोबाइल फोन सध्या हॉंगकॉंगमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला देखील हा शानदार आणि स्वस्त स्मार्टफोन येऊ शकतो. विवो वाय16 4जी कमी किंमत असलेला लो बजेट स्मार्टफोन आहे जो 4GB RAM, MediaTek Helio P35 SoC, 13MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह जागतिक बाजारात आला आहे.

Vivo Y16 4G चे स्पेसिफिकेशन्स

विवो वाय16 4जी स्मार्टफोन कंपनीनं 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह सादर केला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्यात तीन कडा बेजल लेस आहेत परंतु खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Vivo Y16 चे डायमेंशन 163.95×75.55×8.19एमएम आणि वजन 183 ग्राम आहे.

Vivo Y16 4G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 सह मिळून चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. विवो वाय16 4जी Extended RAM 2.0 फिचर सह येतो, त्यामुळे इंटरनल रॅममध्ये अतिरिक्त 1GB virtual RAM जोडता येतो. अशाप्रकारे हा विवो स्मार्टफोन एकूण 5GB रॅमची ताकद देऊ शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

फोटोग्राफीसाठी Vivo Y16 4G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y16 4G एलटीईला सपोर्ट करतो. हा ड्युअल सिम फोन बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येतो तर सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी विवो वाय16 4जी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. हे देखील वाचा: भन्नाट! 19 हजारांत 8GB RAM असलेला फोन; लाँच होण्याआधीच Vivo Y35 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा

Vivo Y16 4G ची किंमत

विवो वाय16 4जी हॉंगकॉंगमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यात 4 जीबी रॅम तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं आपल्या इस स्मार्टफोनची किंमत मात्र उघड केली नाही. परंतु स्पेसिफिकेशन्स पाहून अंदाज लावता येतोय की भारतीय करंसीनुसार Vivo Y16 ची किंमत 12,000 रुपयांच्या आसपास असू शकतो. फोनची किंमत येताच बातमी अपडेट केली जाईल. विवो वाय16 4जी फोन Stellar Black आणि Drizzling Gold कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here