Airtel आणि Vi पैकी कोणाचा 60 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे सर्वात बेस्ट, जाणून घ्या

भारतात लवकरच 5G सर्व्हिस सुरु होणार आहे, त्यामुळे टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे देशातील प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्या Airtel आणि Vodafone Idea आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन सादर करत आहेत. ग्राहकांसाठी या कंपन्या 365 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन देत आहेत. परंतु काही ग्राहकांना दोन महिन्यांच्या प्लॅनची गरज असते, त्यामुळे तुम्ही दोन महीने म्हणजे 60 दिवसांची वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर आम्ही एयरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या 60 दिवस वैधता असलेल्या प्लॅन्सची तुलना करत आहोत. त्यामुळे तुम्हाला यातील कोणता प्लॅन बेस्ट आहे ते समजेल.

Airtel चा 60 दिवसांची वैधता असलेला प्लॅन

Airtel च्या 60 दिवसांची वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत 519 रुपये आहे आणि हा प्लॅन एयरटेलनं आपल्या साइट सोबतच आपल्या अ‍ॅपवर Truly Unlimited कॅटेगरीमध्ये लिस्ट केला आहे. तुम्ही हा रिचार्ज ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून तुमच्या नंबरवर अ‍ॅक्टिव्ह करू शकता. प्लॅनमध्ये 60 दिवसांच्या वैधतेसह कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त अनेक अतिरिक्त बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. हे देखील वाचा: 200 रुपयांत 3 महिन्यांच्या रिचार्ज; BSNL चे 90 दिवसांचे बेस्ट रिचार्ज पॅक, कॉलिंगसह डेटा फ्री

या Prepaid Recharge Plan मध्ये ग्राहकांना 60 दिवसांच्या वैधतेव्यतिरिक्त रोज 1.5GB डेटा दिला जात आहे. म्हणजे प्लॅनमध्ये एकूण 90जीबी डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 SMS फ्री मिळतील. प्लॅनमध्ये अ‍ॅडिशनल बेनिफिट पाहता, यात फ्री हेलो ट्यून आणि विंक म्यूजिक अ‍ॅप सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. याव्यतिरिक्त फास्ट टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कलचा लाभ दिला जात आहे.

Vodafone Idea चा 60 दिवस वैधता असलेला प्लॅन

Vodafone Idea च्या 537 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनीकडून 60 दिवसांची वैधता दिली जात आहे. प्लॅन अंतगर्त ग्राहकांना 50GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 एसएमएस मिळतात. तसेच Vi Movies & TV Classic चा अ‍ॅक्सेस मिळतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक unlimited movies, originals, live TV आणि news इत्यादी कंटेंट बघू शकतील. हे देखील वाचा: Jio-Airtel ची डोकेदुखी वाढवणारी BSNL ची जबरदस्त ऑफर; या दोन रिचार्जवर मिळतोय अतिरिक्त 75GB डेटा

जर तुम्ही विआयचे ग्राहक असाल तर आणि दीर्घ वैधतेसह डेटा व कॉलिंगचा फायदा हवा असेल तर तुम्ही या रिचार्जचा लाभ घेऊ शकता. यात फक्त अनलिमिटेड कॉलिंग मिळत नाही तर डेटा, एसएमएस आणि करमणुकीसाठी विआय मुव्हीज आणि टीव्हीचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे.

निष्कर्ष

दोन्ही प्लॅनमध्ये 60 दिवसांची वैधता दिली जात आहे. परंतु, डेटा तुम्हाला एयरटेलच्या प्लॅनमध्ये जास्त मिळेल. याव्यतिरिक्त दोन्ही प्लॅनमध्ये अन्य बेनिफिट्स सारखेच आहेत. एकंदरीत पाहता कमी किंमतीत बेनिफिट्ससह एयरटेलचा 519 रुपयांचा रिचार्ज बेस्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here