महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली

OnePlus ब्रँडचा अनुभव सर्वांना मिळावा म्हणून कंपनीनं आपली नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिज मधील अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G Phone कंपनीनं 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera आणि 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह यंदा भारतात लाँच केला आहे. तर आता कंपनी या स्मार्टफोनच्या नव्या व अपग्रेड मॉडेलवर काम करत आहे आणि लवकरच OnePlus Nord CE 3 5G फोन लाँच होईल. 91मोबाइल्सला कंपनीच्या घोषणेच्या आधीच वनप्लस नॉर्ड सीई 3 चे फोटोज व स्पेसिफिकेशन्स मिळाले आहेत, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

91मोबाइल्सला OnePlus Nord CE 3 5G चा एक्सक्लूसिव्ह व्हिडीओ मिळाला आहे. या व्हिडीओमध्ये फोन 360 डिग्री अँगलनं दाखवण्यात आला आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनच्या फोटोज सोबतच फोनच्या अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. आशा आहे की साल 2023 च्या सुरुवातीला OnePlus Nord CE 3 5G लाँच होईल. हे देखील वाचा: Motorola चा दणकट स्मार्टफोन येतोय; वनप्लसची सुट्टी करू शकतो Moto X40

कशी असेल OnePlus Nord CE 3 5G ची डिजाईन

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोन पंच-होल डिस्प्ले डिजाइनसह लाँच केला जाईल. सेल्फी कॅमेरा असलेला हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असेल आणि बॉडी एज पासून थोडा दूर ठेवण्यात येईल. फोनचा डिस्प्ले पूर्णपणे फ्लॅट असेल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा चिन पार्ट असेल. फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे.

OnePlus Nord CE 3 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल ज्यात दोन मोठे रिंग आहेत. वरच्या रिंगमध्ये सिंगल कॅमेरा लेन्स आहे तर खालच्या रिंगमध्ये दोन लेन्स फिट करण्यात आल्या आहेत. या रिंग्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. रियर पॅनलवर मध्यभागी OnePlus चा लोगो आहे. तर फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप-सी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पिकर असेल.

असे असतील OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार, हा स्मार्टफोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. स्क्रीन स्टाइल कशी असेल ते तुम्ही वरील फोटोज आणि वीडियोमध्ये पाहू शकता. हे देखील वाचा: अरे वाह! रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone झाला आणखी स्वस्त; डिस्काउंटसह 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा

OnePlus Nord CE 3 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच लीक्सनुसार, वनप्लस मोबाइल फोन 12 जीबी रॅम तसेच 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here