16GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Asus Zenfone 8, यात मिळेल Samsung चा सुंदर डिस्प्ले

Asus ZenFone 8

Asus ZenFone 8 सीरीज कंपनीने गुरुवारी ग्लोबली लॉन्च केली आहे. हि सीरीज एका वर्चुअली आयोजित इवेंटमध्ये सादर केली गेली आहे. असूस झेनफोन 8 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन मॉडेल्स-ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip चा समावेश आहे. या सीरीजच्या लॉन्चच्याआधी असे बोलले जात होते कि कंपनी ZenFone 8 Mini फोन पण या सीरीजमध्ये येऊ शकतो. पण सध्या कंपनीने या नवीन सीरीजमध्ये फक्त झेनफोन 8 आणि झेनफोन 8 फ्लिप सादर केले आहेत. या सीरीजचा लॉन्च कोविडमुळे भारतात पुढे ढकलण्यात आला आहे. पण, बोलले जात आहे कि लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात पण लॉन्च केले जाऊ शकतात. सध्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Asus ZenFone 8 बाबत संपूर्ण माहिती देत आहोत. चला जाणून घेऊया या फोनबाबत सर्वकाही. (Asus Zenfone 8 launched price specifications features)

Asus ZenFone 8 ची डिजाइन

ASUS Zenfone 8 कंपनीने दोन कलर ऑप्शन Obsidian Black आणि Horizon Silver मध्ये सादर केले आहेत. जर झेनफोन 8 च्या डिजाइनबाबत बोलायचे तर डिवाइस होल-पंच डिस्प्लेवर सादर केला गेला आहे. हँडसेटच्या डावीकडे तुम्हाला एक पंच-होल दिसेल. डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या रियर पॅनलवर चौकोनी डुअल कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅश लाइटसह येतो. फोनच्या बॉटमला टाइप सी-चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहेत.

हे देखील वाचा : Samsung चा स्वस्त 5G फोन Galaxy A22s गुगलवर झाला लिस्ट, यात मिळेल Dimensity 700 SoC

Asus ZenFone 8

सॅमसंगचा डिस्प्ले

ASUS Zenfone 8 मध्ये कंपनीने 5.9-इंचाचा सॅमसंग-मेड E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो Full HD+ pixel resolution, 1100 nits पीक ब्राइटनेस आणि 120HZ रिफ्रेश रेटसह येतो. तसेच फोनमध्ये तुम्हाला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन पण मिळेल. एकंदरीत झेनफोन 8 चा डिस्प्ले प्रभावित करतो.

प्रोसेसिंग पावर

हा क्वालकॉमच्या लेटेस्ट आणि सर्वात शक्तीशाली मोबाईल चिपसेटसह येतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरसह येतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 660 GPU देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 6GB/8GB/16GB RAM सह 128GB/256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेऱ्याची कमाल

फोटोग्राफी पाहता डिवाइसमध्ये एक डुअल कॅमेरा सेटअप आहे. रियर-फेसिंग कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक प्राइमरी 64MP सोनी IMX686 सेंसर आहे जो f / 1.8 अपर्चरसह येतो. तसेच, 64MP कॅमेऱ्यासह 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे जो f / 2.2 अपर्चर आणि डुअल PDAF सह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिवाइसमध्ये 12MP कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे. डिवाइस दोन स्पीकर, तीन माइक्रोफोन एकत्र आहेत आणि यात OZO ऑडियो टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे.

ZenFone 8

बॅटरी आणि कनेक्टिविटी फीचर्स

फोन Android 11 सह ZenUI 8 skin वर चालतो. डिवाइसमध्ये IP68 ची रेटिंग देण्यात आली आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता या डिवाइसमध्ये डुअल-सिम सपोर्ट, 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ v5.2, GPS, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि एक USB टाइप- C पोर्ट आहे. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइसचा आकार 148 x 68.5 x 8.9 मिमी आणि वजन 169 ग्राम आहे.

हे देखील वाचा : Samsung चा स्वस्त 5G फोन Galaxy A22s गुगलवर झाला लिस्ट, यात मिळेल Dimensity 700 SoC

किंमत

ASUS Zenfone 8 ची किंमत EUR 599 (53,251 रुपये) पासून सुरु होते. हँडसेट लॉन्च होताच यूरोप आणि तैवानच्या बाजारांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात फोन लॉन्च पुढे ढकलण्यात आला आहे. पण कदाचित परिस्थिती ठीक झाली तर कंपनी हा फोन भारतीय बाजारात घेऊन येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here