घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं

How To Open Bank AC Online: सध्या आधार कार्ड आणि वोटर आयडीप्रमाणे बँक अकाऊंट देखील आवश्यक आहे. तुम्ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्ही स्वतःच बँक अकाऊंट स्वतः ओपन करू शकता. विशेष म्हणजे या डिजिटल युगात तुम्ही घर बसल्या तुमचं बँक अकाऊंट उघडू शकता. या लेखात आम्ही घर बसल्या बँक अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगितली आहे. इथे आम्ही HDFC Bank मध्ये सेव्हिंग अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगितली आहे परंतु सर्व खाजगी बँकांमध्ये ही पद्धत थोड्याफार फरकाने सारखीच असते.

बँक अकाऊंट कसं उघडायचं

आज आम्ही तुम्हाला सेव्हिंग बँक अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगणार आहोत. ऑनलाइन बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरसह आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर आयडी सारखे डॉक्यूमेंट तयार ठेवणं आवश्यक आहे. या डॉक्युमेंट्सच्या आधारावर तुमचं अकाऊंट ओपन होईल. हे देखील वाचा: 43 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर; GT Force नं लाँच केल्या दोन स्वस्त Electric Scooters

HDFC मध्ये सेव्हिंग बँक अकाऊंट उघडण्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1: तुम्हाला या लिंकवर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2: इथे क्लिक करताच तुमच्या समोर एक विंडो उघडेल जिथे सर्वप्रथम मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाका. त्यानंतर खाली दिलेल्या स्टार्ट नाउ बटनवर क्लिक करा.

स्टेप 3: क्लिक केल्यानंतर व्हेरिफाय केलं जाईल आणि तुम्हाला Mr, Ms किंवा थर्ड जेंडरसाठी Mx पैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर बाजूला असलेल्या रकान्यात आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव टाका आणि खाली दिलेल्या Get OTP वर क्लिक करा.

स्टेप 4: त्यानंतर मोबाइल आलेला OTP सबमिट करा आणि कंटिन्यू करा.

स्टेप 5: त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आधार आयडी टाकण्याचा पर्याय मिळेल.

स्टेप 6: आधार नंबर टाकून सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा एक ओटीपी येईल आणि तो सबमिट करा. हा OTP त्या मोबाइल नंबरवर येईल ज्याच्याशी आपका आधार कार्ड कनेक्ट आहे.

स्टेप 7: OTP सबमिट करताच एक नवीन विंडो उघडेल जिथे आधारवरील तुमचा पत्ता येईल. त्यात लँड मार्क टाका आणि सबमिट करा.

स्टेप 8: त्यानंतर एक नवीन पेज येईल ज्यात तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीची माहिती द्यावी लागेल आणि तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर देखील मागितला जाईल. तो देऊन पुढे कंटिन्यू करा.

स्टेप 9: इथे तुमच्याकडे दोन प्रकारचे सेव्हिंग अकाऊंट उघडण्याचे पर्याय मिळतील. यातील ग्रामीण भागांतील अकाऊंटसाठी 10 हजार रुपये तुम्हाला बँलेन्स मेंटेन करावा लागतो तर मेट्रो शहरांमध्ये 25 हजार बॅलेन्स लागतो.

स्टेप 10: अकाऊंटचा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या आई आणि वडिलांची नावे आणि नॉमिनी डिटेल्ससह अन्य माहिती द्यावी लागेल.

स्टेप 11: माहिती दिल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन डॉक्यूमेंट सबमिट करण्यास सांगण्यात येईल. सर्व आवश्यक डॉक्यूमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ कॉलशी कनेक्ट केलं जाईल.

स्टेप 12: या व्हिडीओ कॉलमध्ये तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल आणि ओरिजनल डॉक्युमेंट बघितले जातील. हे देखील वाचा: How To Book Confirm Train Ticket Online: अशाप्रकारे मिळवा प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये मिळवा कंफर्म तिकीट

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमचं बँक अकाऊंट ओपन होईल आणि तुम्हाला दिलेल्या मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर अकाऊंट नंबर पाठवला जाईल. काही दिवसांनी तुमच्या पत्त्यावर डेबीट कार्ड देखील येईल आणि तुम्ही बँकिंग सेवा वापरू शकाल.

Published by
Siddhesh Jadhav