BGMI Ban: बॅन झाल्यावर देखील डाउनलोड करू शकता हा गेम, जाणून घ्या सोपी पद्धत

BGMI APK download: सर्वाधिक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) गेल्या महिन्यात 28 जुलैला भारतात बॅन करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं भारतीय आयटी कायद्याच्या सेक्शन 69 ए अंतगर्त बीजीएमआय भारतात बॅन करण्यात आला आहे. डेव्हलपरकडून मात्र कोणतीही स्टेटमेंट समोर आलेली नाही. बॅन झाल्यानंतर हा Mobile Game अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅप मार्केटप्लेस गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवरून त्वरित हटवण्यात आला, त्यामुळे हा गेम आता अधिकृतपणे डाउनलोड करता येत नाही. परंतु, जर तुम्हाला हा गेम डाउनलोड करायचा असेल तर आम्ही तुम्हाला आज या आर्टिकल मध्ये Android Phone वर हा गेम डाउनलोड करण्याची एक पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे हा बॅन झालेला गेम देखील तुम्हाला खेळता येईल.

BGMI बॅन झाल्यानंतर देखील खेळता येत आहे?

Google Play Store आणि App Store वरून बॅन झाल्यानंतर देखील ते युजर्स BGMI खेळू शकता आहेत, ज्यांच्या फोनमध्ये हा गेम आधीपासून इन्स्टॉल केलेला आहे. त्यामुळे देशात बीजीएमआय सर्वर अजूनही सक्रिय आहे हे समजते आणि प्लेयर्स हा ऑनलाइन बॅटल रॉयल गेम खेळत आहेत. गेम डेव्हलपर्सना पूर्णपणे बॅन करेपर्यंत हे सुरु असेल.

बॅन झाल्यानंतर देखील डाउनलोड करा BGMI

बीजीएमआय प्ले स्टोरवर प्रतिबंधित करून हटवल्यानंतर देखील तुम्ही अजूनही इंटरनेटवरून गेमची एपीके डाउनलोड करून गेम इंस्टॉल करू शकता. तसेच आधीप्रमाणे हा गेम खेळता देखील येत आहे.

बीजीएमआय एपीके म्हणजे काय?

Android OS वर इतर कोणत्याही एपीके (अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन पॅकेज) प्रमाणे बीजीएमआय एपीके एक फाईल आहे ज्यात अ‍ॅप वापरण्यासाठी आवश्यक असलेला कोड असतो. या कोडमुळे एक अँड्रॉइड अ‍ॅप बनतो जो तुम्हाला फक्त अँड्रॉइड मोबाईल फोनवर इंस्टॉल करून अ‍ॅप्लिकेशन वापरण्याची परवानगी देतो. गेम आता प्ले स्टोरवर उपलब्ध नसल्यामुळे एपीकेच्या माध्यमातून तुम्ही अ‍ॅप इंस्टॉल करू शकता आणि जोपर्यंत सर्वर सक्रिय आहे तोपर्यंत गेम खेळू शकता.

BGMI जरी प्रमुख अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आला असला तर ज्यांच्या मोबाईलवर हा गेम आधी इंस्टॉल आहे ते लोक गेम खेळत आहे. याचा अर्थ असा की डेव्हलपरनं भारतात ठेवलेले सर्वर सक्रिय आहेत. हे सर्वर तोपर्यंत सक्रिय राहतील जोपर्यंत एकदा वरिष्ठ अधिकारी ते बंद करण्याची सूचना देत नाही.

एपीके फाइलच्या माध्यमातून बीजीएमआय डाउनलोड करताना तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा पूर्णपणे त्या वेबसाईटवर अवलंबुन असेल जिथून तुम्ही डाउनलोड करत आहात. ती वेबसाईट फेक नाही हे सुनिश्चित करा. तसेच गेम डाउनलोड करण्यापूर्वी लक्षात असू द्या की बीजीएमआयवर युजर्सचा डेटा चीनला पाठवण्याचा आरोप आहे.

BGMI apk अशाप्रकारे करा डाउनलोड

बीजीएमआय एपीके डाउनलोड फक्त अँड्रॉइड मोबाईल फोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया पद्धत …

  • सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर क्रोम किंवा अन्य ब्राउजर ओपन करा आणि “बीजीएमआय एपीके डाउनलोड” सर्च करा.
  • त्यानंतर समोर आलेल्या विश्वासू लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड लिंकसाठी त्या वेबसाईटवर जा जाऊ शकता.
  • त्यानंतर, फक्त डाउनलोड बटनवर टॅप करा आणि एपीके डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.
  • दरम्यान, तुम्हाला एपीके इंस्टॉल करण्यासाठी ‘सेटिंग्स’ मधून ‘Unknown source installations’ ऑप्शन ऑन करावा लागेल.
  • डाउनलोड पूर्ण झाल्यावर, एपीके फाईलवर टॅप करा आणि ‘इंस्टॉल’ वर क्लीक करा.
  • अ‍ॅप इंस्टॉल होण्यास सुरुवात होईल आणि लवकरच तुमच्या अँड्रॉइड फोनवर बीजीएमआय इंस्टॉल होईल
  • त्यानंतर प्लेयर साइन-इन करून तुम्ही गेम खेळू शकाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here