Amazon Great Indian Festival sale: 20000 रुपयांच्या आत आलेल्या 5G phones वर काय आहे ऑफर? जाणून घ्या

जर तुम्ही 5जी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) मध्ये 5जी फोनवर चांगली डील मिळत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत विकत घेऊ शकता. जर तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीती 5जी फोन शोधत असाल तर ह्या आर्टिकलमध्ये आम्ही Samsung, iQOO, Realme इत्यादी टॉप ब्रँडची यादी तयार केली आहे, ज्यावर सध्या चांगली सूट मिळत आहे. तसेच अ‍ॅमेझॉनकडून एसबीआय क्रेडिट कार्ड आणि एसबीआय डेबिट कार्डवर 10 टक्के सूट देखील दिली जात आहे.

Lava Agni 2 5G

लावा अग्नि 2 5G फोन 13 5G बँड सपोर्टसह सर्वात चांगल्या 5G स्मार्टफोन पैकी एक आहे. हा फोन 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो. कंपनीनं फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 6nm प्रोसेसरवर चालतो. स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा 120Hz FHD+ AMOLED कर्व्ड डिस्प्ले आहे. वाइडवाइन L1 DRM सर्टिफिकेशनसह, हा हाय-क्लॅरिटी व्हिडीओ प्लेबॅक देतो. ह्यात मोठ्या बॅकअपसाठी 4,700mAh ची मोठी बॅटरी देखील मिळते.

सेलिंग प्राइस: 21,999 रुपये

डील प्राइस: 17,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

realme Narzo 50 Pro 5G

Realme Narzo 50 Pro 5G बाजारात सर्वात चांगल्या मिड-रेंज 5G स्मार्टफोन पैकी एक आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 920 5G प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 6.4-इंचाचा सुपर AMOLED (90Hz) डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन कॉम्पॅक्ट देखील आहे आणि आरामदायक हँडलिंगसाठी चांगले एर्गोनॉमिक्स देतो. शानदार साउंड क्वॉलिटीसाठी ह्यात डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि हाय-रेज ऑडियो देखील आहे. ऑप्टिक्स पाहता, 48MP AI प्रायमरी कॅमेरा आहे. कंपनीनं ह्यात 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. त्याचबरोबर 33W डार्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

सेलिंग प्राइस: 19,999 रुपये

डील प्राइस: 16,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Xiaomi 11 Lite NE 5G

Xiaomi 11 Lite NE 5G 6.55-इंचाच्या FHD डॉल्बी व्हिजन डिस्प्लेसह येतो. कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरसह हा शानदार डिजाइन असलेला फोन आहे. कंपनीनं ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन 12 5G बँडला सपोर्ट करतो. वायरलेस पेमेंट आणि कनेक्टिव्हिटीसाठी एनएफसी देखील आहे. फोटोग्राफीसाठी 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जो 50+ डायरेक्टर मोडला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 26,999 रुपये

डील प्राइस: 18,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M34 5G

Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ (120Hz) सुपर AMOLED डिस्प्ले आहे. ह्यात 50MP+8MP+2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीनं फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, जी फुल चार्जमध्ये मोठा बॅकअप देते. हा फोन Exynos 1280 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. ह्या फोनमध्ये 12 5जी बँडचा सपोर्ट आहे. कंपनी 4 वर्ष अँड्रॉइड अपग्रेड आणि 5 वर्ष सिक्योरिटी पॅचचा सपोर्ट देते.

सेलिंग प्राइस: 18,999 रुपये

डील प्राइस: 14,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

iQOO Z7s 5G

iQOO Z7s 5G मिड रेंज डिवाइस आहे, जो 6.38-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह येतो. ह्यात 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP OIS प्रायमरी कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच चांगल्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी अ‍ॅडव्हान्स कॅमेरा मोड सारखे अल्ट्रा स्टेबिलाइजेशन व्हिडीओ रेकॉर्डिंग, मायक्रो मूव्ही मोड, ड्युअल व्यू व्हिडीओ, डबल एक्सपोजर, प्रो मोड इत्यादी देण्यात आले आहेत. कंपनीनं फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर दिला आहे. गेमिंगसाठी ह्यात मोशन कंट्रोल, अल्ट्रा गेम मोड आणि 1,200Hz इंस्टंट टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोन 4,500mAh च्या बॅटरीसह येतो आणि क्विक चार्जिंगसाठी 44W फ्लॅशचार्जला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 19,999 रुपये

डील प्राइस: 15,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

realme narzo 60 5G

रियलमी नार्जो 60 5G प्रीमियम डिजाइन असलेला फोन आहे. ह्यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले आहे. 64MP AI हाय-रिजॉल्यूशन कॅमेरा कमी प्रकाशात देखील चांगले शॉट्स घेऊ शकतो. ह्यात 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी आहे. कंपनीनं डिवाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 प्रोसेसर दिला आहे, जो डेली टास्क सहज हँडल करू शकतो.

सेलिंग प्राइस: 17,999 रुपये

डील प्राइस: 14,749 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

Redmi Note 12 5G

Redmi Note 12 5G पॉपुलर 5G डिवाइस आहे. ह्यात 6.67-इंचाचा FHD+ (120Hz) AMOLED डिस्प्ले आहे, जो इमर्सिव व्हिज्युअल देतो. दैनंदिन कामांसाठी ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे. ह्यात 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आहे, तसेच फ्रंट सेल्फी कॅमेरा 13MP चा आहे.

सेलिंग प्राइस: 18,999 रुपये

डील प्राइस: 15,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy A14 5G

सॅमसंग गॅलेक्सी A14 5G एक आणि 5G स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 6.6-इंच (90Hz) FHD+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50+2+2MP हाय-रिजॉल्यूशन कॅमेरा सेटअप आहे. कंपनीनं ह्यात 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, जी एकदा फुल चार्ज केल्यावर 2 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते. फोनमध्ये सॅमसंग Exynos 1330 प्रोसेसर आहे, जो डेली टास्क सहज सांभाळू शकतो.

सेलिंग प्राइस: 17,999 रुपये

डील प्राइस: 15,599 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G बजेट फ्रेंडली फोन आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसरवर चालतो. ह्यात 6.58-इंचाचा FHD+ (120Hz) डिस्प्ले आहे. कंपनीनं फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी फुल चार्जमध्ये बराच वेळी चालते. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन 50MP आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो, जो उत्तम फोटोज क्लिक करतो. हा अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित फनटच ओएसवर चालतो.

सेलिंग प्राइस: 14,499 रुपये

डील प्राइस: 11,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

OnePlus Nord CE 3 Lite 5G

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी वनप्लसचा एक लोकप्रिय मिड-रेंज डिवाइस आहे, जो वेगवान परफॉर्मन्स आणि मोठ्या डिस्प्लेसह येतो. ह्यात 680 निट्झ पीक ब्राइटनेससह 6.72-इंचाचा FHD+ (120Hz) डिस्प्ले आहे. कंपनीनं फोनमध्ये 67W SuperVOOC एंडोरन्स एडिशन फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ह्यात 108MP चा रियर कॅमेरा आहे, जो चांगले फोटोज क्लिक करतो. तसेच, फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑक्सीजन ओएस-आधारित अँड्रॉइड 13 ओएसवर चालतो. स्मूद परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G ला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 19,999 रुपये

डील प्राइस: 17,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here