5,999 रुपयांच्या Redmi A1 च्या आणखी एका व्हर्जनची माहिती आली समोर

Highlights

  • Redmi A1 स्मार्टफोन भारतात 5,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
  • MediaTek Helio P35 प्रोसेसरसह फोनचं नवीन व्हर्जन येऊ शकतो.
  • मूळ रेडमी ए1 मध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Xiaomi सब-ब्रँड रेडमीनं गेल्यावर्षी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 लाँच केला होता. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो भारतात 5,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio A22 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच रेडमी ए1 बद्दल बातमी येत आहे की कंपनी या फोनचा आणखी एक मॉडेल घेऊन येऊ शकते जो MediaTek Helio P35 प्रोसेसरवर काम करू शकतो.

या नवीन रेडमी स्मार्टफोनची माहिती सध्या एक लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. एक एफसीसी डॉक्यूमेंट इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात Xiaomi 23036RN54G मॉडेल नंबर असलेल्या एका मोबाइल फोनचा उल्लेख करण्यात आला आहे. डॉक्यूमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे की हा फोन Xiaomi 220733SL मॉडेल नंबर असलेल्या डिवायसचं रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. पहिला व्हर्जन मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसरला सपोर्ट करतो तर नवीन व्हर्जनमध्ये हीलियो पी35 दिला जाऊ शकतो. लीकमध्ये हे दोन्ही फोन Redmi A1 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Redmi A1 Price

रेडमी ए1 स्मार्टफोन सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय बाजारात आला होता. या फोनची लाँच प्राइस 6,499 रुपये होती जी आता कमी होऊन 5,999 रुपये झाली आहे. या फोनमध्ये 2जीबी रॅम मिळतो तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Xiaomi Redmi A1 Light Blue, Black आणि Light Green कलरमध्ये विकत घेता येईल.

Redmi A1 Specifications

  • 6.52″ HD+ डिस्प्ले
  • MediaTek Helio A22 प्रोसेसर
  • 8MP ड्युअल रियर + 5MP सेल्फी कॅमेरा
  • 10W 5,000mAh बॅटरी

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here