स्मार्टफोन निर्माता कंपनी LeTV नं काही वर्षांपूर्वी भारतात हवा केली होती. परंतु सध्या ही कंपनी फक्त चीनमध्ये सक्रिय आहे. LeTV नं आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन LeTV Y2 Pro लाँच केला आहे. जो जुन्या LeTV Y1 Pro ची जागा घेईल. LeTV Y2 Pro चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या फोनची डिजाइन iPhone 13 Pro सारखी आहे. म्हणजे खूप कमी किंमतीत ग्राहकांना iPhone 13 Pro वापरल्याचा फील मिळणार आहे. तसेच LeTV Y2 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील खूप दमदार आहे. पुढे आम्ही तुम्हाला LeTV Y2 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.
LeTV Y2 Pro ची डिजाईन
LeTV Y2 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनीनं LeTV Y1 Pro च्या तुलनेत अनेक अपग्रेड केले आहेत. फोनच्या फ्रंटला मध्यभागी एक नॉच देण्यात आली, अँड्रॉइड फोन्समध्ये अशी डिजाईन सध्या जास्त दिसत नाहीत. फोनचा बॅक पॅनल देखील हेबेहूब Apple iPhone 13 Pro सारखा दिसतो कारण इथे लेटेस्ट आयफोन सारखा दिसणारा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सिस्टम देण्यात आली आहे. हे देखील वाचा: जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? 64MP कॅमेरा असलेला Oppo चा दमदार फोन फक्त 927 रुपयांमध्ये
LeTV Y1 Pro चे स्पेसिफिकेशन्स
LeTV Y2 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन स्लिप्ट स्क्रीन ऑपरेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये ऑक्टा कोर Unisoc प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत रॅम आणि 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात गुगलच्या ऐवजी Huawei HMS सर्व्हिसचा वापर करण्यात आला आहे.
LeTV Y2 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या अन्य कॅमेरा सेन्सरची माहिती समोर आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. या फोनमध्ये कंपनीनं 4,000mAh ची बॅटरी दिली आहे. हे देखील वाचा: शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन
LeTV Y2 Pro ची किंमत
LeTV Y2 Pro स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये दाखल झाले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅम + 32GB स्टोरेजसह 599 युआन (सुमारे 7,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोनचा 4GB रॅम + 128GB स्टोरेजसह 799 युआन (सुमारे 9,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 6GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 999 युआन (सुमारे 11,800 रुपये) आहे. LeTV Y2 Pro स्मार्टफोन मॅजिक नाईट ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू आणि समर ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये सादर झाला आहे.














