PUBG नंतर BGMI वर देखील बंदी, बॅन असून देखील गेमिंग सुरूच

BGMI Ban In India: बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (बीजीएमआय) आता गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध नाही. रिपोर्ट्सनुसार सरकारच्या आदेशानंतर हा गेम भारतात बॅन (BGMI banned in India) करण्यात आला आहे. परंतु अजून काही चित्र स्पष्ट झालं नाही, बीजीएमआयवरील बंदी PUBG मोबाईल सारखी वाटते आहे, जो गेल्यावर्षी चीनशी संबंध असल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आला होता. द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राज्यसभेत एक रिपोर्ट देत सांगितले की, अशा बातम्या आणि तक्रारी आहेत की प्रतिबंधित अ‍ॅप नवीन अवतारात देखील तेच काम करत आहे जे पबजी करत होता म्हणून तपासासाठी गृह मंत्रालयाला रिपोर्ट देण्यात आला आहे. तुमच्यासाठी माहितीसाठी BGMI म्हणजे PUBG Mobile चं रीब्रँडेड व्हर्जन आहे.

BGMI वर का झाला बॅन

भारतात बीजीएमआयवरील बंदी मागे कोणतेही ठोस कारण समोर आलेलं नाही. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, पबजी सारख्या ऑनलाइन गेममुळे वाद होऊन एका 16 वर्षीय मुलाने आपल्या आईचा गोळी घालून खून केला आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरु आहे. तुम्हाला माहित असेल की Krafton Inc नं PUBG बॅन झाल्यानंतर BGMI गेम बाजारात आणला होता. ज्यात काही बदल करण्यात आले होते परंतु यात PUBG ची वैशिष्ट्ये होतीच आणि हीच वैशिष्ट्ये बीजीएमआयवरील बंदीसाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

PUBG New State मात्र उपलब्ध

बीजीएमआय गेम अ‍ॅपस्टोर्सवरून हटवल्यानंतर देखील क्राफ्टनचा नवीन गेम PUBG न्यू स्टेट Google Play Store आणि App Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे PUBG न्यू स्टेट किंवा फक्त न्यू स्टेट मध्ये बीजीएमआयसारखाच गेमप्ले आहे, परंतु याचे ग्राफिक्स चांगले आहेत. हा गेम डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 4GB रॅम आणि Android 6 वरील Android डिवाइस व iOS 13 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टम असलेला iPhone असणं आवश्यक आहे.

तसेच जरी बंदी घालण्यात आली असली तरी बीजीएमआय अजूनही खेळता येत आहे. ज्या युजर्सच्या मोबाईल्समध्ये हा गेम आहे ते कोणत्याही अडचणीविना हा गेम खेळत आहेत. तसेच ज्या स्मार्टफोन्समध्ये गेम इन्स्टॉल केलेला आहे ते युजर्स एपिके एक्सट्रॅक्टरच्या मदतीनं एपिके फाईल अन्य स्मार्टफोन्सना शेयर करू शकतात. ही एपिके फाईल इन्स्टॉल करून कोणीही बीजीएमआय खेळू शकतो. त्यामुळे ही बंदी आहे की नाही हे स्पष्ट होतं नाही.

PUBG वरील बंदी

PUBG सह सरकारनं गेल्यावर्षी इतर अनेक चीनी अ‍ॅप्स केले होते. तसेच या अ‍ॅप वरील बंदीच्या निर्णयामागे सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचं कारण दिले होते. तसेच प्रतिबंधित अ‍ॅप्सच्या यादीत पबजी व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय अ‍ॅप्लीकेशनचा समावेश होता. यात पबजी मोबाईल लाईट, बायडू, सुपर क्लीन, शाओमीचा शेयरसेव्ह, वीचॅट वर्क, सायबर हंटर आणि त्याचं लाईट व्हर्जन, गेम ऑफ सुल्तान्स, गो एसएमएस प्रो, मार्वेल सुपर वार इत्यादी अ‍ॅप्सचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here