फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला 40 इंचाचा स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

Highlights

  • Blaupunkt नं सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतात लाँच केला आहे.
  • Flipkart Big Saving Days sale मध्ये हा टीव्ही विकला जाईल.
  • या टीव्हीमध्ये 512MB रॅम आणि 4GB बिल्ट-इन स्टोरेज आहे.

Blaupunkt सिग्मा 40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा टीव्ही कंपनीनं फ्लिपकार्टसह पार्टनरशिपमध्ये लाँच केला आहे. या नवीन टीव्हीमध्ये 40 इंचाचा डिस्प्ले, दोन 40 वॉटचे स्पिकर आणि सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या लेटेस्ट किफायतशीर टीव्हीची संपूर्ण माहिती दिली आहे.

40-इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत आणि उपलब्धता

Blaupunkt स्मार्ट टीव्हीची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे हा टीव्ही भारतातील सर्वात किफायतशीर 40-इंच अँड्रॉइड टीव्हीच्या यादीत समाविष्ट होतो. तसेच हा टीव्ही 4 मे पासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ब्लापंक्ट सिग्मा 40-इंच स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स

  • 60Hz Refresh Rate
  • 40W Speakers

यात एचडी रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 300 निट्स ब्राइटनेस साथ 40 इंचाचा एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑडियो आउटपुट बद्दल बोलायचं झालं तर नवीन ब्लापंक्ट सिग्मा सीरीज स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 40W स्टीरियो बॉक्स स्पिकर आहेत.स्पीकर ऑडियो आउटपुट डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रू सराऊंड टेक्नॉलॉजी द्वारे ट्यून करण्यात आले आहेत.

  • Chromecast
  • 4GB Storage

परफॉर्मन्ससाठी यात माली जी31 जीपीयू सह एमलॉजिक क्वॉड-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच हा चिपसेट 512MB रॅम आणि 4GB बिल्ट-इन स्टोरेजसह येतो. हा एक Android स्मार्ट टीव्ही आहे ज्यात Google Assistant, बिल्ट-इन Chromecast आणि अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी Play Store आहे.

  • 3HDMI Port
  • Dedicated OTT Buttons

टीव्हीमध्ये रिमोट कंट्रोल आहे ज्यात Amazon Video, Zee5, Sony LIV, आणि Voot साठी डेडिकेटेड बटन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, आरएफ इनपुट, ब्लूटूथ आणि वाय-फाय ऑप्शन आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील

4 मे पासून सुरु होत आहे फ्लिपकार्ट सेल

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान ब्लापंक्टच्या अनेक टीव्ही मॉडेल्सवर आकर्षक सूट दिली जात आहे. ग्राहक फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह 5% कॅशबॅक आणि एसबीआय कार्डच्या ट्रँजॅक्शनवर 10% इन्स्टंट सूट मिळवू शकतात. फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 4 मेला सुरु होईल, जो 10 मे पर्यंत चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here