आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Moto G 5G (2023) जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे
  • फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • यात 48MP ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो.

मोटोरोलानं टेक मार्केटमध्ये आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करत नवीन Moto G 5G (2023) स्मार्टफोन लाँच केला आहे. हा गेल्यावर्षी आलेल्या कंपनीच्या सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन मोटो जी 5जीचा अपग्रेडेड व्हर्जन आहे जो आता Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. पुढे या मोटोरोला फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

मोटो जी 5जी (2023) चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5” HD+ Display
  • 120Hz refresh

हा मोटोरोला फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हे देखील वाचा: अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु

  • Qualcomm Snapdragon 480+
  • 4GB RAM + 128GB Storage

मोटो जी 5जी (2023) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे जो स्टॉक अँड्रॉइड 13 सह येतो. या फोनमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

  • 48MP Triple Rear camera
  • 8MP selfie camera

फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओसाठी यात एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • 5,000mAh battery
  • 15W Fast Charging

पावर बॅकअपसाठी मोटोरोला जी 5जी (2023) स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोन वेगानं चार्ज करण्यासाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन

  • 3.5mm Audio Jack
  • Side Fingerprint Sensor

Moto G 5G (2023) मध्ये sub-6GHz 5G कनेक्टिव्हिटी मिळते. या मोटोरोला फोनची थिकनेस फक्त 8.4एमएम आहे. तसेच यात 3.5एमएम जॅक, डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here