BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर

Highlights

  • बीएसएनएल एक लाखांपेक्षा जास्त साइट्सवर 4G आणणार
  • BSNL 4G भारतात TCS सह डिप्लॉय केला जाईल.
  • बीएसएनएलला 24,500 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे इक्विपमेंट्स मिळणार.
  • BSNL 4G Network पूर्णपणे मेड इन इंडिया असेल.

BSNL 4G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कंपनी देशात जवळपास 1 लाख साइट्सवर आपलं 4जी नेटवर्क सुरु करणार आहे. Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे बीएसएनएलला बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे आणि आता Tata Consultancy Services (TCS) सरकारी दूरसंचार कंपनीला जवळपास 24,500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स पुरवेल. महत्वाची बाब म्हणजे BSNL 4G network पूर्णपणे भारतीय असेल.

1 लाख साइट्सवर सुरु होणार BSNL 4G network

टीसीएस कंपनी बीएसएनएलला 1 लाख साइट्सवर 4जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी 4जी इक्विपमेंट्स उपलब्ध करून देईल. या डीलसाठी आता बीएसएनएलच्या बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे. या मंजुरीनंतर TCS कडून BSNL ला 24,556.37 कोटी रुपयांच्या उपकरणांचा पुरवठा केला जाईल. हे देखील वाचा: दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL आणि TCS की डील अंतगर्त टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला पुढील 10 वर्षांसाठी आपली टेक्नॉलॉजी व उपकरणं देईल. यात TCS कडून येणाऱ्या systems integrator (SI) चे काम सर्वात महत्वाचे असेल. डीलनुसार या नेटवर्क इक्विपमेंट्सचा एकूण खर्च 13,000 कोटी रुपयांच्या आसपास असेल. तसेच टीसीएस सोबतच Tejas Networks बीएसएनएलसाठी 4जी इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करेल.

BSNL 4G Launch होण्यास उशीर का

बोर्डाकडून जरी परवानगी मिळाली असली तरी अजून बीएसएनएल 4जी नेटवर्क लाइव्ह होण्यास थोडा वेळ लागेल. ईटीच्या रिपोर्टनुसार बोर्डचा हा घेऊन बीएसएनएल आता Department of Telecommunications (DoT) कडे जाईल. आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आपला मसुदा तयार करून तो Group of Ministers (GoM) कडे पाठवेल. हे देखील वाचा: येत आहे कमी किंमत असलेला स्वस्त Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन; या तारखेला होईल भारतात लाँच

डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आणि मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बीएसएनएल कंपनी टीसीएस म्हणजे Tata Consultancy Services ला पैसे देऊन त्यांच्याकडून 4जी इक्विपमेंट्सची खरेदी करेल. ही प्रोसेस Reliance Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्यांच्या तुलनेत थोडी जास्त मोठी आहे आणि त्यामुळे भारतात BSNL 4G Launch होण्यास उशीर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here