Tecno Pop 7 Pro 16 फेब्रुवारीला होईल भारतात लाँच; कंपनीनं केलं ट्विट

Highlights

  • Tecno Pop 7 Pro याच आठवड्यात भारतात लाँच होईल.
  • हा फोन 3GB Extended RAM टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.
  • या टेक्नो मोबाइलची किंमत 12 ते 15 हजार दरम्यान असू शकते.

टेक्नोनं काही दिवसांपूर्वी एक जबरदस्त बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Tecno POP 6 Pro लाँच केला होता. आता या स्मार्टफोनचा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन भारतात येत आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की भारतीय बाजारात नवीन Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन येईल. आता कंपनीनं फोनची लाँच डेट देखील सांगितली आहे. टेक्नो पॉप 7 प्रो 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. हे देखील एक लो बजेट मोबाइल फोन असेल ज्याची किंमत 12 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. पुढे आम्ही या टेक्नो फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Tecno Pop 7 Pro

  • 6.6″ HD+ Display
  • 5,000mAh Battery
  • 3GB Extended RAM
  • MediaTek Helio A22
  • 13MP AI Dual Rear Camera

टेक्नो पॉप 7 प्रो स्मार्टफोन नायजेरिया मध्ये सादर करण्यात आला, त्यामुळे फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. हा मोबाइल फोन क्वॉडकोर प्रोसेसर असलेल्या मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेटवर चालतो. टेक्नोनं आपला हा फोन 3जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या बजेटवर जाऊ नका; जबरदस्त गेमिंग प्रोसेसरसह Poco X5 GT येणार

Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही वॉटरड्रॉप नॉच स्टाईल स्क्रीन आहे जी 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. या फोनची उंची 163.86एमएम आणि रुंदी 75.51एमएम आहे. वहीं टेक्नो पॉप 7 प्रो फक्त 8.9एमएम जाड आहे.

फोटोग्राफीसाठी या टेक्नो मोबाइलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह सेकंडरी एआय लेन्स देण्यात आली आहे जी ड्युअल फ्लॅशसह येते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Tecno Pop 7 Pro ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 3.5एमएम जॅक देखील मिळतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आशा आहे की 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होणारा टेक्नो पॉप 7 प्रो देखील याच स्पेसिफिकेशन्ससह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here