टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) कडे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. यात 1GB, 1.5GB 2GB डेली डेटा देणारे प्लॅन्स जास्त लोकप्रिय आहेत. परंतु काही युजर्सना यापेक्षा जास्त डेटाची रोज गरज असते. अशा ग्राहकांसाठी कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये डेली 3 जीबी डेटा देणारे प्लॅन देखील जोडेल आहेत. आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 3 जीबी डेटा आणि इतर अनेक बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत. जर तुम्ही देखील Jio 3GB data per day Recharge Plan शोधत असाल तर पुढे आम्ही जियोच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या यादीतील दोन प्लॅन्सची माहिती दिली आहे, जे तुम्हाला सर्वाधिक डेली डेटा देतील. हे देखील वाचा: वनप्लसच्या तोडीचा Samsung फोन लाँचसाठी तयार; Galaxy A54 5G वेबसाइटवर लिस्ट
Jio 3GB Daily Data Plan
- Jio Rs 419 Plan
- Jio Rs 1199 Plan
जियोचा 419 रुपयांचा प्लॅन
या रिचार्जमध्ये ग्राहकांना डेली 3 जीबी डेटा दिला जातो. प्लॅनच्या संपूर्ण वैधतेमध्ये एकूण 84GB एकूण इंटरनेट डेटा वापरता येतो. रोजचा डेटा संपल्यावर देखील ग्राहकांना मर्यादित स्पीडनं इंटरनेट वापरता येतं. कंपनी या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देत आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. त्यामुळे तुम्ही ऑन किंवा ऑफ नेटवर्कवर अमर्याद कॉल्स करू शकता. तसेच रोज 100 एसएमए देखील मोफत मिळतात. जियोच्या 419 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जियो अॅप्सचा मोफत अॅक्सेस देखील मिळतो. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या बजेटवर जाऊ नका; जबरदस्त गेमिंग प्रोसेसरसह Poco X5 GT येणार
जियोचा 1199 रुपयांचा प्लॅन
या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोज 3GB डेटा मोफत दिला जातो. फक्त यात वैधता जास्त असल्यामुळे याची किंमत जास्त आहे. हा प्लॅन जवळपास तीन महिन्याच्या म्हणजे 84 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कालावधीत एकूण 252GB इंटरनेट डेटा ऑफर केला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नंबरवर अमर्याद बोलण्यासाठी कंपनीनं अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील दिली आहे. जोडीला रोज 100 एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये करमणुकीची सोय देखील आहे, ज्यासाठी ग्राहक जियो अॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनचा वापर करू शकतात.