रिलायंस जियोला टक्कर देण्यासाठी इतर टेलीकॉम कंपन्या कमी किंमतीत आपल्या सेवा देत आहेत. यात सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पण अनेक दिवसांपासून नवीन आणि शानदार सेवा देत आहे. आता कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या नवीन आणि बंपर ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना 5जीबी हाईस्पीड डेटा मोफत देत आहे. ग्राहकांना हा फ्री डेटा कंपनीच्या वाईफाई हॉटस्पॉटच्या माध्यमातून मिळेल. याची माहिती BSNL ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली आहे.
बीएसएनएल ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर एक यूट्यूब वीडियोची लिंक शेयर केली आहे. या वीडियो मध्ये त्या सर्व स्टेप्स सांगण्यात आल्या आहेत, ज्या फॉलो करून यूजर्स 5 जीबी मोफत डेटाचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे या ऑफरचा लाभ कंपनीचे लँडलाइन यूजर्स पण घेऊ शकतात. पुढे तुम्हाला स्टेप्सची माहिती देत आहोत.
अश्याप्रकारे मिळेल मोफत 5GB डेटा
1. सर्वात आधी आपल्या स्मार्टफोन मध्ये WiFi ओपन करा आणि BSNL Wi-Fi SSID ची निवड करा.
2. त्यानंतर तीन पर्याय दिसतील, ज्यात Public Wifi, BSNL users आणि Landline चा समावेश असेल.
यातील Landline पर्याय निवडा.
3. हा पर्याय निवडल्यानंतर यूजर्सना यात बीएसएनएल लँडलाइन नंबर STD कोड सह लिहावा लागेल आणि नंतर Get PIN वर टॅप करावे लागेल.
4. मग तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक PIN येईल, जो टाकून Login करावी लागेल.
6. त्यानंतर यूजर्सना मोफत 5GB डेटा दिला जाईल.
कंपनी कडून या सेवेसाठी तीन प्रकारचे कूपन मिळतील. हे कूपन ग्रामिण भागांसाठी असतील. याची किंमत 25 रुपये, 45 रुपये, आणि 150 रुपये असेल. तसेच शहरी भागांसाठी वेगळे प्लान्स असतील, ज्यांची सुरवात 10 रुपयांपासून सुरु होऊन 1999 रुपयांपर्यंत जाईल.
25 रुपयांच्या बीएसएनल रूरल वाईफाई प्लान बद्दल बोलायचे तर यात यूजर्सना 7 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेटा मिळेल. तर 150 रुपयांच्या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी 28 जीबी डेटा मिळेल. सध्या 45 रुपयांच्या प्लानची माहिती समोर आलेली नाही.















