BSNL च्या 31 दिवसांच्या या Plan नं Jio ची उडवली झोप! स्वस्तात जास्त डेटासह फ्री कॉलिंग

टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी अर्थात ट्रायनं काही महिन्यांपूर्वी 28 दिवसांच्या एक महिन्याची वैधता असलेले प्लॅन्स सादर करण्यास सांगितले होते. जियो आणि एयरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी मंथली रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. BSNL नं देखील आपल्या युजर्ससाठी अनेक प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत ज्यात 30 Days Validity किंवा महिन्याची वैधता मिळते. काही दिवसांपूर्वी कंपनीनं यात दोन नवीन मंथली रिचार्ज प्लॅनची भर टाकली आहे.

Bharat Sanchar Nigam Limited च्या घोषणेनुसार, 228 रुपये आणि 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण एक महिन्याची वैधता (Monthly Validity Plan) मिळेल. या प्लॅनचे बेनिफिट्स पाहता हे प्लॅन हेवी डेटा युजर्ससाठी बनवण्यात आले आहे, असं वाटतं. इतकेच नव्हे तर हे प्लॅन Reliance Jio आणि Airtel च्या प्लॅनला देखील टक्कर देतात. चला जाणून घेऊया BSNL च्या या दोन नवीन प्रीपेड प्लॅनबाबतची माहिती.

BSNL 1 Month Validity Recharge

  • BSNL Rs 228 Prepaid Plan
  • BSNL Rs 239 Prepaid Plan

BSNL चा 228 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 228 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर, हा मंथली वॅलिडिटीसह येतो. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 2GB डेली डेटाचा लाभ मिळेल. मिळणारा डेटा संपल्यावर देखील ग्राहकांना 80 Kbps वर डेटा वापरता येईल. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये 100 SMS प्रति दिन मिळतील. बीएसएनएलच्या या प्लॅनसह ग्राहकांसाठी प्रोग्रेसिव वेब अ‍ॅपवर चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिसचा फायदा देखील दिला जात आहे.

BSNL चा 239 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 239 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन पाहता, यात 10 रुपयांच्या टॉकटाइमसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा ग्राहकांना मिळतो. टॉकटाइम युजरच्या मेन अकाऊंटमध्ये जोडला जाईल. तसेच, युजर्सना 100 एसएमएस प्रति दिन मिळतील. तसेच 2GB डेली डेटाचा लाभ देखील घेता येईल, या प्लॅनमधील 2GB डेटा सम्पल्यावर इंटरनेटचा स्पीड 80 Kbps होईल आणि त्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा वापरता येईल. या प्लॅनसह गेमिंग बेनिफिट्स देखील देण्यात आले आहेत.

BSNL चा 1 महिन्याची वैधता असलेले प्लॅन

या दोन्ही प्लॅनची खासियत म्हणजे यात कोणतीही ठराविक वैधता मिळत नाही. म्हणजे या प्लॅनमध्ये दिवसांची मर्यादा ठरलेली नाही जितक्या दिवसांचा महिना असेल, हे प्लॅन्स तितके दिवस चालतील. जर एखाद्या महिन्यात 30 दिवस असतील तर हा BSNL Plan 30 दिवसांची वॅलिडिटी देखील आणि जर 31 दिवसांचा महीना असेल तर बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 31 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. थोडक्यात ज्या तारखेला बीएसएनएलचाचा हा रिचार्ज केला जाईल, पुढील महिन्यात त्याच तारखेपर्यंत प्लॅन वापरता येईल.

Note: बीएसएनएलचे प्लॅन देशात वेगवेगळ्या सर्कल्समध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी एकदा कस्टमर केयर किंवा कंपनीच्या साईटवरून कन्फर्म करून घ्यावं.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here