भारतात येण्याआधी Samsung Galaxy A14 5G अमेरिकेत ऑफिशियल

Highlights

  • Samsung Galaxy A14 5G ची यूएसमधील किंमत $199.99.
  • भारतीय करंसीनुसार 16,200 रुपयांमध्ये सॅमसंगचा 5G Phone.
  • गॅलेक्सी ए14 5जी फोन 18 जानेवारीला येणार भारतात.
  • RAM Plus, 50MP camera आणि MediaTek Dimensity 700 सारखे फिचर.

गेले कित्येक दिवस बातमी येत आहे की सॅमसंग भारतात आपले दोन बजेट फ्रेंडली 5G Phone सादर करणार आहे. यातील लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A14 कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात सादर करू शकते. परंतु आता भारतीय बाजारात येण्याआधी आज हा स्मार्टफोन अमेरिकेत ऑफिशियल झाला आहे. गॅलेक्सी ए14 5जी यूएस मध्ये $199.99 मध्ये लाँच झाला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 16,200 रुपयांच्या आसपास आहे. पुढे आम्ही या सॅमसंग स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: 11 हजारांत दीड लाखांच्या आयफोनचे फिचर; डायनॅमिक आयलंडसह LeEco S1 Pro लाँच

Samsung Galaxy A14 5G Price

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचा एकच मॉडेल अमेरिकेत आला आहे. हा मोबाइल फोन 4जीबी रॅमसह 64 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 199.99 यूएस डॉलर आहे जो 16,200 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की भारतीय बाजारात देखील हा स्मार्टफोन मिड बजेटमध्ये लाँच केला जाईल आणि Galaxy A14 5G इंडिया प्राइस 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

Samsung Galaxy A14 5G Specifications

  • 6.6″ FHD+ 90Hz display
  • 4GB RAM + 64GB storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Rear Camera
  • 15W 5,000mAh battery

Samsung Galaxy A14 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर चालतो. यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. यूएस मध्ये गॅलेक्सी ए14 5जी 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे परंतु भारतात जास्त व्हेरिएंट्स अपेक्षित आहेत. हा स्मार्टफोन 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरचा असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए14 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हा सॅमसंग फोन 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. फोनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 204 ग्राम आहे. हे देखील वाचा: ती पुन्हा आली! LML कंपनीनं सादर केली शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Star

Samsung Galaxy A14 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी देखील वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा सॅमसंग मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here