सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या नवीन वॅलिडिटी एक्सटेंशन प्लान सादर केला आहे. हा प्लान फक्त प्रीपेड यूजर्स साठी सादर केला गेला आहे. कंपनीने हा PV-49 नावाने सादर झाला आहे. BSNL द्वारा सादर केलेल्या हा प्रीपेड वाउचर फक्त मध्यप्रदेश सर्कलच्या यूजर्स साठी सादर केला गेला आहे.
या प्लान सह तुम्हाला 180 दिवसांची वैधता मिळेल. तसेच फ्री मोबाईल डेटा आणि वॉयस कॉलचा लाभ पण यूजर्सना दिला जाईल. चला बघूया BSNL PV-49 प्रीपेड रिचार्ज प्लानची संपूर्ण माहिती.
DreamDTH वेबसाइट नुसार कंपनीने हा प्लान काही यूजर्स साठी सादर केला आहे. या BSNL प्रीपेड प्लान मध्ये 250 मिनिटे डेली लोकल आणि नॅशनल वॉयस कॉल 9 दिवसांसाठी मिळतील. त्यांनंतर लोकल आणि नेशनल कॉल साठी 40 पैसे प्रति मिनिटे असेल. प्लान मध्ये 1जीबी डेटा 15 दिवसांसाठी मिळेल. तसेच प्लान मध्ये यूजर्सना 180 दिवसांची वैधता मिळेल.
अलीकडेच कंपनीने 1098 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केले होते. हा प्लान सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल च्या बेसिक प्रीपेड प्लान्स मधला एक होता. जो रिलायंस जियोच्या स्वस्त प्लान्सना टक्कर देण्यासाठी 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला गेला होता. आता या प्रीपेड प्लान मध्ये बदल केला गेला आहे.
कंपनीने या प्लान मध्ये बदल करत याची ओवरऑल डेटा लिमिट ठरवली आहे, सोबत प्लानची वॅलिडिटी पण 9 दिवसांनी कमी केली आहे. 1,098 रुपयांचा बीएसएनएलचा प्रीपेड प्लान आतापर्यंत यूजर्सना डेटा बेनिफिट्स व्यतिरिक्त वॉइस कॉलिंग आणि एसएमएस 84 दिवसांसाठी देत होता, आता हि वैधता कमी करून 75 दिवस करण्यात आली आहे.














