प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत असताना बीएसएनएल आपल्या प्लॅन्समध्ये खूप बदल करत आहे. अलीकडेच कंपनीनं आपल्या वेबसाइटवरून 71 रुपये, 104 रुपये, 135 रुपये आणि 395 रुपयांचे प्लॅन हटवले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या ग्राहकांना निराश होण्याची गरज नाही कारण कंपनीनं दोन नवीन STV रिचार्ज देखील आपल्या पोर्टफोलियोमध्ये जोडले आहेत. चला जाणून घेऊया या नवीन रिचार्जमध्ये कोणते बेनिफिट्स मिळतील आणि कोणते प्लॅन कंपनीनं बंद केले आहेत.
BSNL STV Rs 269 आणि Rs 769 plans
बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक फेस्टिव्हल धमाका ऑफर सादर केली आहे, ज्यात एसटीव्ही 269 रुपये आणि एसटीव्ही 769 रुपये या प्लॅन्सचा समावेश आहे. 269 रुपयांच्या रिचार्ज बद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 2 जीबी डेटा, डेली 100 एसएमएस, बीएसएनएल ट्यून्स आणि झिंग अॅपचा अॅक्सेस मिळतो. तसेच प्लॅन्समध्ये इरोज नाऊचं सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.
तसेच बीएसएनएल एसटीव्ही 769 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 2 जीबीाडेटा, बीएसएनएल ट्यूनचा अॅक्सेस, रोज 100 एसएमएस, लोकधुन अॅप्लिकेशनचा कंटेंट, झिंग अॅपचा अॅक्सेस आणि 90 दिवसांसाठी इरोस नाऊ एंटरटेनमेंटचा अॅक्सेस मिळतो. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती
कंपनीनं बंद केले चार प्लॅन
BSNL STV71: या रिचार्जमध्ये युजर्सना फ्री कॉलिंग आणि डेटा असे बेनिफिट नाचते तर या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता मिळत होती. तसेच युजर्सना वापरण्यासाठी 20 रुपये मिळत, ज्यांचा वापर कॉलिंगसाठी व एसएमएस पाठवण्यासाठी करता येत होता.
BSNL STV104: बीएसएनएल एसटीव्ही 104 बद्दल बोलायचं झालं तर यात 18 दिवसांची वैधता मिळत होती. त्याचबरोबर या रिचार्जमध्ये 99 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्स आणि एक डिस्काउंट कुपन मिळत होता.
BSNL STV135: या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1440 व्हॉइस कॉलिंग मिनिट्सचा फायदा दिला जात होता.
BSNL STV395: या प्लॅनमधील बेनिफिट्स पाहता यात युजर्सना 71 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 3000 मिनिट्स कॉल (ऑन-नेट) + 1800 मिनिट्स ऑफ-नेट कॉल मोफत मिळत होते. तसेच मोफत कॉल मिनिट्स संपल्यावर युजर्स 20 पैसे प्रति मिनिट दराने कॉल करू शकत होते. त्याचबरोबर रिचार्जमध्ये 2GB डेली डेटा मिळतो. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परवडणाऱ्या किंमतीत! OnePlus Ace 2V सह कंपनी पुन्हा ठरणार का ‘फ्लॅगशिप कीलर’
सरकारी दूरसंचार नेटवर्क कंपनी यावर्षी देशात 4जी आणि कदाचित पुढील वर्षी 5जी नेटवर्क सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच नवीन नेटवर्क आल्यावर नवीन प्लॅन्स करण्याच्या उद्देशाने कंपनी जुने प्लॅन्स हटवून नवीन प्लॅन अॅड करू शकते.