शून्य रुपयांचे डाउन पेमेंट आणि Nokia G60 वर दोन वर्षांची वॉरंटी फ्री; अशी आहे ऑफर

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

नोकियानं काही महिन्यांपूर्वी भारतात नवीन 5जी मोबाइल फोन Nokia G60 5G सादर केला होता. हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो असा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे या हँडसेटवर दोन वर्षांची वॉरंटीही कंपनी देत आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 120Hz Display, 50MP Camera, 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. आता कंपनीनं सादर केलेल्या ऑफर अंतर्गत नोकिया जी60 5जी स्मार्टफोन शून्य रुपये डाउन पेमेंटसह घरी घेऊन येत येईल. चला जाणून घेऊया ऑफर.

Nokia G60 5G Offer

सर्वप्रथम किंमत आणि सेल पाहता नोकिया जी60 5जी स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे कंपनीनं यावर कोणताही डिस्काउंट दिला नाही. परंतु तुम्ही हा फोन बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून ईएमआयवर विकत घेऊ शकता. या ऑप्शनसाठी तुम्हाला 0 रुपये डाउन पेमेंट द्यावं लागेल, यावर 0 टक्के व्याज आकारलं जाईल आणि 0 रुपये प्रोसेसिंग द्यावी लागेल. थोडक्यात एकही रुपया न देता तुम्ही Nokia G60 5G Phone घरी आणू शकता. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

Nokia G60 5G Specifications

नोकिया जी60 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोन स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 165.99×75.93×8.61एमएम आणि वजन 190 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

Nokia G60 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो. हा नोकिया मोबाइल इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला हा फोन आयपी52 रेटिंगसह सादर केला आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टंट बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here