एंट्री लेव्हल Moto E13 झाला युरोपात लाँच

Highlights

  • Moto E13 सध्या युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • हा फोन अँड्रॉइड ‘गो’ एडिशन वर चालतो.
  • यात 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी.

Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी अनेक हँडसेट सादर करून प्राइस सेगमेंटमधील ग्राहकांना खुश केलं आहे. Moto G53 5G आणि Moto G73 5G सादर करून 5G च्या ग्राहकांना खुश केलं आहे तर Moto G13 आणि Moto G23 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आले आहेत. तसेच मोटोरोलानं आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Moto E13 देखील लाँच केला आहे.

या स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी यात 6.5 इंचाचा मोठा डिस्प्ले, 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh battery असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आला आहे. हा एंट्री लेव्हल डिवायस असल्यामूळे कंपनीनं यात Android 13 Go edition ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. या फोनमध्ये Google Go Apps डाउनलोड आणि इन्स्टाल करता येतात आणि कमी रॅम व स्टोरेजसह हा फोन स्मूद प्रोसेस करू शकतो. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Moto E13 Price

मोटोरोलानं मोटो ई13 स्मार्टफोन युरोपमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा मोबाइल 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 119.99 यूरो आहे जी भारतीय करंसीनुसार 10,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं हा मोटोरोला ई13 Creamy White, Aurora Green आणि Cosmic Black कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Moto E13 Specifications

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 2GB + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 269पीपी आयला सपोर्ट करते. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर परिणाम होत नाही. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ सह लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. मोटो ई13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here