विवोने सादर केला स्वस्त मोबाईल फोन Vivo Y18e, पाहा फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत

91 मोबाईलने मागच्या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह बातमीमध्ये सांगितले होते की विवो कंपनी भारतात आपल्या ‘वाय’ सीरिजचा विस्तार करणार आहे ज्यानुसार Vivo Y18 आणि Vivo Y18e स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. तसेच आज विवो इंडिया वेबसाईटवर यामधील एक विवो वाय 18 ई चे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे, जिथे मोबाईलची सर्व माहिती अधिकृत देण्यात आली आहे.

Vivo Y18e चे स्पेसिफिकेशन

  • 6.56″ 90 हर्ट्झ एचडी डिस्प्ले
  • मीडियाटेक हीलियो जी 85 प्रोसेसर
  • 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज
  • 4 जीबी एक्सटेंडेड रॅम
  • 13 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर
  • 5,000 एमएएचची बॅटरी

डिस्प्ले : Vivo Y18e स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.56 इंचाच्या एचडी स्क्रीनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते तसेच 528 निट्स ब्राईटनेस आऊटपुट प्रदान करते.

प्रोसेसर : विवो वाय 18 ई स्मार्टफोन अँड्रॉईड ओएसवर बनला आहे जो फनटच ओएस 14.0 सह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 12 एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी 85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : Vivo Y18e 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. यात 4 जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी पण ​आहे जी फिजिकल रॅमसह मिळून फोनला 8 जीबी रॅमची ताकद प्रदान करतो. हा डिव्हाईस LPDDR4X RAM + eMMC 5.1 ROM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच यात 1 टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड लावला जाऊ शकतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी विवो वाय 18 ई ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/3.0 अपर्चर असणारा 0.08 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह मिळून चालतो. तसेच Vivo Y18e मध्ये 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चरवर चालतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी लो बजेट स्मार्टफोन Vivo Y18e मध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी या मोबाईलला 15 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आले आहे.

इतर फिचर्स : विवो वाय 18 ई ला IP54 रेटिंगसह सादर केले आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिजिकल सेन्सरची जागा फक्त फेस अनलॉक फिचर मिळतो. फोनमध्ये Bluetooth 5.0 देण्यात आले आहे.

Vivo Y18e किंमत

कंपनीकडून सध्या फोनची किंमत सांगण्यात आलेली नाही, परंतु 91 मोबाईलला सोर्सच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा मोबाईल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाईल तसेच सोर्सनुसार Vivo Y18e किंमत 7,999 रुपये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here