या फेस्टिव सीजन मध्ये जर तुम्ही पण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. आता पर्यंत तुम्ही असे अनेक किस्से ऐकले असतील ज्यात एखाद्या ई-कॉमर्स शॉपिंग साइट वरून सामान तर मागवले जाते पण डिलीवर वेगळेच काहीतरी होते. अशीच एक नवीन घटना दिल्ली मध्ये घडली आहे. साउथ एक्सटेंशन मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आनंदाने आपली आईसाठी अमेझॉन इंडिया वरून Redmi 8A Dual स्मार्टफोन ऑर्डर केला होता, पण त्याच्या आनंदावर विरझन तेव्हा पडले जेव्हा ऑर्डर डिलीवर झाल्यानंतर त्याने बॉक्स उघडला. बॉक्स उघडल्यावर त्या व्यक्तीला त्यात फोनच्या ऐवजी कपड्यांच्या रिन साबणाची वडी सापडली आहे. त्रासलेल्या ग्राहकाने त्वरित अमेझॉन इंडियाशी संपर्क केला. तसेच याबाबत 91मोबाईल्सने त्या व्यक्तीकडून माहिती पण घेतली आहे.
नेमके काय घडले
फेस्टिव सीजन पाहून दिल्लीच्या साउथ एंक्सटेंशन मध्ये राहणाऱ्या Naman Vaish ने आपल्या आईसाठी 24 ऑक्टोबरला Redmi 8A Dual स्मार्टफोन ऑर्डर केला होता. नमनने 91मोबाईल्सला सांगितले कि या ऑर्डरची डिलिवरी त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला मिळाली. पण ऑर्डर मिळाल्यानंतर जेव्हा फोनचा बॉक्स उघडण्यात आला तेव्हा त्यात फोनच्या जागी कपड्याचा साबण रिन होता. इतकेच नव्हे तर बॉक्स मध्ये फोन व्यतिरिक्त चार्जर केबल पण नव्हती.
ट्विट करून केली तक्रार
नमनने याबाबत ट्विटर वर अमेझॉन इंडियाकडे तक्रार केली, त्यानंतर अमेझॉनने कॉल करून त्याला आश्वासन दिले कि 4-5 दिवसांत कंपनी इन्वेटस्टिगेंशन करून त्याला नवीन फोन किंवा त्याच्या बदल्यात पैसे रिफंड करेल.
हे देखील वाचा :
याबाबत 91मोबाईल्सच्या टीमने अमेझॉन इंडियाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अमेझॉनकडून उत्तर आल्यास न्यूज अपडेट केली जाईल. ई-कॉमर्स साइट वरून फोनच्या जागी साबण पाठवण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण अश्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
















