Huawei P40 आणि Huawei P40 Pro या आठवड्यात 26 मार्चला ग्लोबली लॉन्च केले जाणार आहेत. लॉन्चच्या आधी दोन्ही स्मार्टफोन्स बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. आता या फ्लॅगशीप फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती टिप्सटर ईशान अग्रवालने 91मोबाईल्सला दिली आहे. चला जाणून घेऊया या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स
Huawei P40 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
या सीरीज मधील सर्वात मोठ्या वेरिएंट Huawei P40 Pro 5G बद्दल बोलायचे तर टिप्सटरने दावा केला आहे कि फोन मध्ये Leica अल्ट्रा विजन क्वाड कॅमेरा सेटअप असेल. या कॅमेरा सेटअप मध्ये 50MP प्राइमरी सेंसर, 40MP सेकेंडरी सेंसर, 12MP कॅमेरा आणि 3D ToF सेंसर असेल. फोन मधील टेलीफोटो कॅमेरा 50x सुपरसेंसिंग झूम आणि स्टेबलाइजेशनला सपोर्ट करेल. टिप्सटरनुसार कॅमेऱ्यामध्ये Huawei XD Fusion Engine असेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 32MP मेन सेंसर आणि डेप्थ सेंसर असेल. तसेच फोनच्या फ्रंटला वाइड पिल-शेप कटआउट दिली जाईल.
Some more gorgeous high quality renders of the Black and Silver Frost HUAWEI P40 Pro 5G showing all angles of the phone! #HUAWEI #P40Pro #HUAWEIP40Series #HUAWEIP40Pro #P40Pro5G pic.twitter.com/CELTKsvHNv
— Ishan Agarwal (@ishanagarwal24) March 20, 2020
Huawei P40 Pro मध्ये 6.58-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच पावरसाठी फोन मध्ये कंपनी स्वतःचा Kirin 990 5G SoC देऊ शकते. पण अजूनही रॅम आणि स्टोरेज मॉडलच्या किंमतीची माहिती समोर आलेली नाही. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,200mAh बॅटरी आणि 40W वायर्ड फास्ट चार्जिंग असेल. फोन मध्ये 40 वॉट वायरलेस चर्जिंग सपोर्ट पण असेल.
Huawei P40 चे स्पेसिफिकेशन्स
Huawei P40 पाहता हा या सीरीज मध्ये येणारा कॉम्पॅक्ट डिवाइस असेल. हँडसेट मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले पंच होल सेल्फी कॅमेरा असेल. Huawei P40 मध्ये फ्रंटला फक्त एक सिंगल 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असेल जो सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी उपयोगी पडेल. तसेच मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 50MP + 16MP + 8MP Leica अल्ट्रा विजन सेंसर 30X डिजिटल झूम आणि चांगल्या फोटोसाठी Huawei XD Fusion Engine असेल.
Huawei P40 मध्ये पावर बॅकअपसाठी 3,800mAh ची बॅटरी असेल जी 40 वॉट वायर्ड चर्जिंग आणि 27 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल. दोन्ही फोन्सच्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला अधिकृत लाँन्चची वाट बघावी लागेल.
याआधी समोर आलेल्या बातमीनुसार हुआवे पी40 आणि पी40 प्रो च्या बेस वेरिएंटची किंमत क्रमशः 3,988 चीनी युआन (जवळपास 42,100 रुपये) आणि 5,488 चीनी युआन (जवळपास 58,000 रुपये) असेल. तसेच हा फोन भारतात लॉन्च होईल कि नाही याची माहिती पण मिळाली नाही.














