एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम सह लॉन्च होईल रियलमी 1, लॉन्च च्या आधी बघा फोनचे फोटो

देशाची नंबर वन टेक कंपनी बनलेल्या शाओमीला टक्कर देण्यासाठी ओपो ने भारतात आपला नवीन सब-ब्रांड रियलमी लॉन्च केला आहे. नवीन ब्रांड सादर करून ओपो ने ही पण घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 15 मे ला रियलमी ब्रांड अंतर्गत कंपनी चा पहिला स्मार्टफोन रियलमी 1 लॉन्च करणार आहे आणि हा फोन शॉपिग साइट​ अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. पण कंपनी कडून रियलमी 1 च्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली नाही पण आम्ही लॉन्च च्या आधी तुमच्या साठी फोन ची एक्सक्सूसिव ईमेज आणि काही महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

एक्सक्लूसिव : 4जीबी रॅम आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च होईल वीवो वाई75एस

91मोबाईल्स ला रियलमी ब्रांड च्या पहिल्या स्मार्टफोन रियलमी 1 चे एक्सक्लूसिव फोटो मिळाले आहेत. या प्राप्त फोटो मध्ये रियलमी 1 स्मार्टफोन चा बॅक पॅनल दाखविण्यात आला आहे. फोनचा रियर पॅनल डायमंड ब्लॅक फिनिश वाला आहे, जो प्रीमियम फील देतो. फोन च्या बॅक पॅनल वर उजवीकडे सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. फोन च्या मधोमध रियलमी ब्रांड लिहले आहे आणि खाली ओपो चा लोगो पण आहे.

रियलमी 1 च्या उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आले आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहेत. पण फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही, आशा आहे की हा फोन फेस अनलॉक फीचर सह येईल. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार रियलमी 1 स्मार्टफोन मध्ये 6जीबी ची रॅम मिळेल तसेच हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो पी60 प्रोसेसर वर चालेल.

जियोचा नवीन डाव : जियोफाइबर ची झाली सुरवात, फ्री मध्ये मिळत आहे 100 जीबी हाई स्पीड डाटा

ओपो च्या सब-ब्रांड रियलमी कडुन हा फोन 1 पेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी येणार्‍या 15 मे ला हा फोन जगा समोर आणेल आणि तेव्हाच फोन ची किंमत समजेल. विशेष म्हणजे 15 मे ला आॅनर चा स्टाईलिश स्मार्टफोन आॅनर 10 पण भारतात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here