एक्सक्लूसिव : 4जीबी रॅम आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च होईल वीवो वाई75एस

काही दिवसांपूर्वी टेक कंपनी वीवो चा आगामी स्मार्टफोन वाई75एस चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता. टेना वर झालेल्या लिस्टिंग मध्ये हे समजले आहे की वीवो वाई75एस नावाच्या कोणत्यातरी फोन वर काम करत आहे, पण या फोनचे स्पेसिफिकेशन्स काय असतील तसेच हा फोन बाजारात लॉन्च केला जाईल याबद्दल काही माहिती मिळाली नाही. वीवो वाई75एस बद्दल 91मोबाईल्स च्या टीम ने याचा शोध घेतला आणि या फोन च्या सर्व स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळवली आहे. या रिपोर्ट मध्ये तुम्हाला लॉन्च च्या आधी वीवो कंपनी वाई75एस चे स्पेसिफिकेशन्स समजतील.

91मोबाईल्स ने सूत्रांकडून एक्सक्लूसिव माहिती मिळवली आहे की वीवो वाई75एस 18:9 आस्पेक्ट रेशियो बेजल लेस डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 5.99-इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. प्राप्त माहितीनुसार हा फोन एंडरॉयड 7.1 नुगट वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट मिळेल.

वीवो वाई75एस ची मोठी खासियत या फोन चा एआई असिस्टेंट ‘जोवी’ आहे. कंपनी कडून या फोन मध्ये 4जीबी ची रॅम मेमरी दिली आहे तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर वीवो वाई75एस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाईल आणि सेल्फी साठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

प्राप्त माहितीनुसार वीवो वाई75एस गेमिंग मोड असेल जो गेम खेलताना नोटिफिकेशन्स स्क्रीन वर फ्लॅश होणे बंद करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,225एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. वीवो वाई75एस ला कंपनी मॅट ब्लॅक, शेपेंन गोल्ड, चार्म रेड आणि डीप ब्लू कलर वेरिएंट मध्ये हा फोन लॉन्च फोन करू शकते. हा फोन भारतीय बाजारात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here