Exclusive: Samsung Galaxy M40 लवकरच ऑफलाइन स्टोर वर सेल साठी होईल उपलब्ध

Samsung ने यावर्षी फेब्रुवारीत आपल्या नवीन एम सीरीज फोनची सुरवात केली होती. M सीरीज खासकरून ऑनलाइन स्टोर साठी बनवण्यात आली होती. परंतु एम सीरीजचा फोन आता ऑफलाइन स्टोर वर पण सेल साठी उपलब्ध होतील आणि याची सुरवात कंपनी Galaxy M40 पासून करणार आहे. 91मोबाईल्सला या बद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. कंपनीने फेब्रुवारी मध्ये आपली नवीन गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च केली होती ज्या अंतर्गत सर्वात आधी Galaxy M20 आणि Galaxy M10 मॉडेल सादर केला होता. त्यानंतर Galaxy M30 आणि जून मध्ये Galaxy M40 लॉन्च केला गेला. आतापर्यंत हे फोन्स ई-कॉमर्स स्टोर अमेझॉन इंडिया आणि सॅमसंग ई-स्टोर वरून विकत घेता येत होते. परंतु लवकरच Galaxy M40 ऑफलाइन स्टोर वर येणार आहे.

आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर द्वारे मिळाली आहे. ज्यात आम्हाला सांगण्यात आले आहे कि “लवकरच पंच-होल डिस्प्ले असलेला सॅमसंगचा स्वस्त फोन ऑफलाइन स्टोर वर येणार आहे. याबद्दल कंपनी एक्जिक्यूटिव ने आम्हाला सूचित केले आहे. किंमत किती असेल याची अजूनतरी माहिती देण्यात आलेली नाही. कदाचित फोनच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किंमतीत थोडा फरक असेल.”

सॅमसंगच्या आधी शाओमी आणि रियलमी सारख्या ब्रँडसनी हि रणनीती वापरली आहे. यांचे फोन आधी ऑनलाइन स्टोर मध्ये उपलब्ध होतात आणि नंतर हे ऑफलाइन उपलब्द होतात. या श्रेणी मध्ये आता सॅमसंगचे नाव पण जोडले गेले आहे.

हे देखील वाचा: Jio GigaFiber 12 ऑगस्टला होऊ शकते लॉन्च, मिळेल 100जीबी पर्यंत कॉम्प्लिमेंटरी डेटा

इनफिनिटी ओ डिस्प्ले

Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन आहे जो अशाप्रकारच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन बेजल लेस डिजाईन वर बनला आहे ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या डाव्या बाजूला छोटासे छिद्र दिले जाईल आणि याच छिद्रात Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा आहे. असा डिस्प्ले याआधी हाईएंड फ्लॅगशिप गॅलेक्सी एस10 सीरीज मधेच दिसला होता.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M40 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी-ओ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स आधारित सॅमसंगच्या यूजर इंटरफेस वन यूआई वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. तसेच चांगल्या ग्राफिक्स आणि गेमिंग साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ-सेंसिंग कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी Samsung Galaxy M40 मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M40 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात उतरवला आहे. Galaxy M40 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Galaxy M40 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम40 वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here