सॅमसंग घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला गॅलेक्सी ए90 फोन, वीवो आणि ओपोची होऊ शकते सुट्टी

गेल्यावर्षीपासूनच बातमी येत आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज सोबत गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन मॉडेल याचवर्षी साल लॉन्च करेल. अलीकडेच 91मोबाईल्स ने गॅलेक्सी ‘ए’ सीरीज मधील गॅलेक्सी ए50 च्या फ्रेम आणि पॅनल्स चा एक फोटो एक्सक्लूसिवली शेयर केला होता. ज्यावरून या फोनच्या डिजाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. आता याच सीरीज मधील गॅलेक्सी ए90 बद्दल माहिती समोर आली आहे.

पॉप्युलर टिप्सटर ‘आइस यूनिवर्स’ ने आपल्या ट्विटर हँडेल वर खुलासा केला आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए90 स्मार्टफोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.’ आइस यूनिवर्स ने ट्वीट मध्ये सांगितले आहे कि ‘ए90′ पर्फेक्ट आहे. हा सॅमसंगचा पहिला फ्रंट पॉप-अप कॅमेरा असलेला फोन असेल, याची स्क्रीन परफेक्ट आहे, यात कोणतीही नॉच किंवा होल नसेल.’

अजूनतरी या फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आलेली नाही. पण आशा आहे कि यावर्षीच्या शेवट्पर्यंत दुसऱ्या डिवाइस सोबत हा लॉन्च केला जाईल.विशेष म्हणजे सॅमसंग ने गेल्यावर्षी आपल्या ‘ए’ सीरीज मध्ये तीन आणि चार रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स सादर केले होते. या रेंजची सुरवात गेल्यावर्षी नोव्हेंबर मध्ये कंपनी ने आपला पहिला ‘क्वॉड-रियर कॅमेरा’ (चार रियर कॅमेरे असलेला) गॅलेक्सी A9 लॉन्च करून केली होती.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन अलीकडेच गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता तिथे हा एसएम-ए505जीएन मॉडेल नंबर सह उपलब्ध होता. लिस्ट केले गेलेल्या फोन मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला होता तसेच हा एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. लिस्ट केला गेलेला फोन एक्सनोस 9610 चिपसेट वर उपलब्ध होता 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरची माहिती देण्यात आली होती. पण लॉन्चच्यावेळी क्लॉक स्पीड अजून जास्त असू शकतो.

सोबतच फोनबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या या डिवाइसचा मुख्य सेंसर 24-मेगापिक्सलचा असू शकतो. पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here