दूरदर्शनच्या जुन्या मालिका येणार ऑनलाइन; प्रसार भारतीसाठी तयार होत आहे नवीन OTT प्लॅटफॉर्म

Highlights

  • टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांमध्ये घसरण होत आहे.
  • सरकार प्रसार भारतीचा एक ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्याचा निर्णय घेत आहे.
  • इंटरनेटविना मोबाइलवर टेलिव्हिजन पाहण्याची देखील सुविधा दिली जाईल.

OTT च्या दिशेनं प्रेक्षकांचा वाढत असलेलं ओढा पाहून आता लवकरच प्रसार भारतीचा कंटेंट देखील एका एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. केंद्र सरकार आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये मोठा बदल करण्याचा विचार करत आह. प्रेक्षकांची संख्या पुन्हा एकदा वाढवण्यासाठी प्रसार भारतीच्या कंटेंटसाठी स्वतंत्र OTT Platform सुरु करण्याची योजना बनवत आहे.

इंटरनेटविना मोबाइलवर पाहता येईल टेलिव्हिजन >

माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा यांनी म्हटलं आहे की सरकार एफएम रेडियो स्टेशनचा नव्याने से लिलाव करणे, ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करणे आणि डायरेक्ट-टू-मोबाइल (डीटूएम) टेलिव्हिजन प्रक्षेपणाची टेस्टिंग करण्याची योजना बनवत आहे. यातील डीटूएम टेक्नॉलॉजी कोणत्याही इंटरनेटविना मोबाइलवर टेलिव्हिजन स्ट्रीमिंग करण्याची सुविधा देऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग सोसायटी एक्सपोमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म बाबत माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सांगितलं की, “आम्ही प्रसार भारतीसाठी एक ओटीटी प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना बनवत आहोत. आमची योजना 2023-24 मध्ये हे प्लॅटफॉर्म आणण्याची आहे.” हे देखील वाचा: “वापर जास्त असेल तर पैसे देखील जास्त द्यावे…”; Vodafone Idea च्या सीईओनं दिला दरवाढीचा इशारा

त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ग्रामीण आणि सीमेवरील भागातील प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी आगामी आर्थिक वर्षात 600 कोटी रुपये दिले जातील. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आयआयटी-कानपुर आणि अनेक लॅब्सनी कर्तव्य पथ आणि आसपासच्या भागात ट्रांसमीटर स्थापन केले आहेत, ज्यातून दाखवून देण्यात येईल की टेलिव्हिजन सिग्नल थेट मोबाइलवर कशाप्रकारे प्रसारित करता येईल.

जुन्या मालिका पुन्हा पाहता येणार का

आम्हाला आशा आहे की जर प्रसार भारतीसाठी नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म आलं तर त्यात डीडी नॅशनल तसेच डीडी सह्याद्रीवरील जुन्या आणि अविस्मरणीय मालिका आणि शो देखील जोडले जातील. जरी ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही. परंतु असं झालं तर आपण कधीही दामिनी, तिसरा डोळा, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, श्वेतांबरा, अस्मिता इत्यादी मराठी कार्यक्रम तसेच रामायण, महाभारत, चाणक्य, शक्तीमान, देख भाई देख, श्रीमान श्रीमति, सर्कस आणि ब्योमकेश बख्शी असे हिंदी शो देखील बघता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here