XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत

Highlights

  • Tata Motors नं Tata Nexon EV Prime आणि Nexon EV MAX ची किंमत कमी केली आहे.
  • Nexon EV MAX च्या टॉप व्हेरिएंटची किंमत आता Rs 18.99 lakh (ex-showroom) झाली आहे.
  • Nexon EV MAX मध्ये आता सॉफ्टवेयर अपडेट नंतर 16km ची रेंज जास्त मिळेल.

Tata Motors नं आपल्या इलेक्ट्रिक कार्स Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX च्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. ही घोषणा Mahindra च्या पहिल्या इलेक्ट्रिक कार XUV400 च्या लाँच नंतर दोन दिवसांनी करण्यात आली आहे. महिंद्राच्या ईव्हीमुळे टाटा मोटर्सची चिंता वाढल्याची चर्चा या प्राइस कटमुळे सुरु झाली आहे आणि मार्केटमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे. टाटानं आपल्या Tata Nexon MAX XZ+ Lux variant च्या किंमतीत 85,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता हिची प्राइस Mahindra XUV400 EL व्हेरिएंट एवढी झाली आहे.

टाटा मोटर्सनी किंमत कमी आणि रेंज वाढवली

Mahindra XUV400 ची किंमत 15.59 lakh (ex-showroom) रुपयांपासून सुरु होते. तर Nexon EV ची प्रारंभिक किंमत Rs 14.49 lakh (ex-showroom) आहे. इतकेच नव्हे तर Tata Motors नं एक नवीन सॉफ्टवेयर अपडेटच्या मदतीनं Tata Nexon MAX ची रेंज 453km केली आहे जी XUV400 च्या 456km रेंजच्या आसपासच आहे. हे देखील वाचा: आणखी एक स्वस्त रेडमी फोन येणार बाजारात; 5,999 रुपयांच्या Redmi A1 च्या आणखी एका व्हर्जनची बातमी आली

Tata Nexon EV ची नवीन किंमत

Mahindra XUV400 च्या तुलनेत Tata Nexon EV Prime चा वेब व्हेरिएंट 1 लाख रुपये स्वस्त झाला आहे. Tata Nexon EV MAX लाइनअपच्या किंमतीत 85,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीतील हा बदल भारत सरकारच्या प्रोडक्शन-लिंक्ड-इंसेंटिव्स (पीएलआई) योजनेच्या माध्यमातून झाला आहे जी देशात ईव्ही निर्मितीवर सब्सिडी देते. तसेच किंमतीती कपात Mahindra XUV400 EV SUV च्या किंमतीचा खुलासा झाल्यावर काही दिवसांनी झाला आहे जी Tata Nexon EV ची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. हे देखील वाचा: बाजारावरील पकड मजबूत करण्यासाठी सॅमसंगची नवी योजना; Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज

Tata Nexon EV MAX ची रेंज वाढली

Tata Nexon EV MAX मध्ये एक नवीन सॉप्टवेयर अपडेट देण्यात आला आहे. त्यामुळे कारची रेंज 16km नं वाढली आहे. या अपडेट नंतर कंपनीचा दावा आहे की कार की रेंज 453km होईल. नवीन सॉफ्टवेयर अपडेट बॅकव्हर्ड कंपेटिबल आहे, ज्याचा अर्थ असा की जुने टाटा नेक्सन ईव्ही मॅक्स ग्राहक 15 फेब्रुवारीपासून अतिरिक्त रेंजचा लाभ घेऊ शकतील. कारण टाटा जुन्या वाहनांना नवीन सॉफ्टवेयर सादर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here